संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा येथील २३ वर्षीय महिला घरात एकटी असल्याचे पाहुन घरात अनअधिकृत प्रवेश करून वाईट उद्देशाने सदर महिलेचा हात पकडून तु मला खुप आवडते म्हणुन फिर्यार्दी महिलेचा विनयभंग केल्याची घटना आज साडे अकरा वाजता सोनाळ्यात घडली
या बाबत थोडक्यात हकिकत असे कि सोनाळा येथील महिला एकटी घरी असल्याचे पाहुन घरात प्रवेश करून वाईट उद्देशाने हात पकडून जवळ ओढले फिर्यादी महिलेला तु मला खुप आवडते असे म्हणुन विनयभंग केला व यापुर्वी फिर्यार्दी महिले गावात पाठलाग केला होता फिर्यार्दी महिलेने सोनाळा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यार्दी वरुन आरोपी शेख रहेमत शेख आमद रा सोनाळा याच्या विरूध्द कलम ३५४ , ३५४ ( ड ) ४५१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केले असुन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. हे.कॉ विनोद वानखडे करित आहे