विशेष बातमी

पातुर्डा प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करा- माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील मंजुरात झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते तथा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी केली.प्रसिद्ध माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी म्हटले की, पातृर्डा गावासह पंचकृषीतील १३ ते १४ खेड्यांची लोकसंख्या पाहता प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. यासंदर्भात शासन व प्रशासनाकडे उपरोक्त विषयांचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीस मंजुरात मिळाली होती. मात्र, मंजुरात कामाची ई-निविदा घेतलेल्या ठेकेदाराचा अकास्मित निधन झाल्यामुळे इमारत बांधकामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती याची जाणीव ठेवत प्रा.आ.केंद्राच्या इमारतीचे नविन टेंडर काढुनी बांधकाम सुरू करावे अशी मागणी संगितराव भोंगळ यांनी केली.
पुढे त्यांनी म्हटले की, मुलभुत व शाश्वत विकासाला प्रथम प्राध्यान दिले, पातृर्डा गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत गरज आहे. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण स्तरावर शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी, शेतमजुर व नवजात शिशु सह इतर प्राथमिक उपचाराची गरज आहे त्यामुळे नविन प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज निर्माण होत आहे त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविता यावी यासाठी नव्याने ईमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भोंगळ यांनी केली आहे.जुनी इमारत शतीग्रस्त असल्यामुळे ती पाडण्यात आली
त्यामुळे पुर्णतः आरोग्य सेवा कोलमडली.निव्वळ एकाच खोलीतुन रुग्णांना सेवा दिल्या जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे आरोग्यसेवेचा प्रश्न उपस्थित झाला.पातृर्डा गावासह पंचकृषीतील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. मागिल ५-६ वर्षांपासुन सुरु असलेल्या संघर्षाला यश प्राप्त झाले मात्र, तांत्रिक अडचणी मुळे मंजुर झालेल्या नव्या ईमारतीचे बांधकाम थांबले. या संदर्भात प्रशासनाने लक्ष देवुन लवकर नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता घिवेसाहेब यांची ११ जून २०२४ रोजी भेट घेऊन संगितराव भोंगळ (राजू पाटील) यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *