सप्तसुरांनी सजलेल्या गाता रहे मेरा दिल चे आयोजन बुलढाण्यात
बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप चे आयोजन
बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप च्या वतीने हिंदी गीताचा सुरेल नजराणा गाता रहे मेरा दिल चे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम 29 जून रोजी सायंकाळी 7:30 ला येथील सहकार विद्या मंदिर रंगमंच भवन मध्ये आयोजित करण्यात आले आहे या वेळी कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या विविध गीतांचा नजराणा साजरा तसेच नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे हा कार्यक्रम येथील दिव्य सेवा प्रकल्पाच्या मदतीसाठी घेण्यात येत आहे गीत बहरव्या या कार्यक्रमात प्रामुख्याने अनंत देशपांडे हे सादरीकरण करणार आहेत यासोबत ग्रुप व्यवस्थापक व गायक उमेश अंजनकर, संगीत संयोजन प्रशांत ठाकरे, यासह गायक रामेश्वर काळे मनीष काबरा शितल तायडे गौरी शिंदे सादरीकरण करणार आहेत
यावेळी सादरीकरण केले जाणारे नृत्यविष्कार आहेत दिग्दर्शक प्रकाश मेश्राम करतील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा नसीर खान यांच्या खांद्यावर राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे