निरोड शिवारातील गोठ्यातुन ३ बैल चोरी पशु पालकाचे दिड लाखाने आर्थिक नुकसान अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील निरोड येथील शेतकरी किशोर देवराव देशमुख यांचे निरोड शेतशिवारातील शेत गट क्र. ५९ मधील गोठ्यात बांधलेले ३ बैल अज्ञात आरोपींने चोरुन नेल्याची घटना २७ जुन रोजी पहाटे ५ वाजता उघडकीस आली या बाबत थोडक्यात हकीकत अशी कि तालुक्यातील निरोड शिवारात शेतकरी किशोर देशमुख यांच्या शेतातील गोठ्यात लाल धामना रंगाचा वय अंदाजे ६ वर्ष, शेपुट गोंडा काळ्या लाचा तसेच पांढ-या रंगाचा ज्यावर लाल धामन्या रंगाचे ठीपके असलेला वय अंदाजे ६ वर्ष , शेपुट,गोंडा काळया रंगाचे , व जांभा रंगाचा यय अंदाजे ६ वर्षे, शेपुट गोंडा काळा, प्रत्येकी अंदाजे किमत ५० हजार रुपये असे एकुण 3 बैलांची किंमत दिड लक्ष रुपये. अज्ञात चोरट्याने चोरुन नेले शेतकरी वैभव अशोकराव देशमुख यांनी तामगाव पोस्टे दिलेल्या फिर्यार्दी वरुन तामगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार विष्णु कोल्हे करित आहे
प्राणी चोरट्यांची टोळी सक्रिय
संग्रामपुर तालुक्यात प्राणी चोरट्यांची टोळी सक्रिय असुन जनावर सह दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पशुपालक शेतकरी नागरिक हतबल हवालदिल झाले आहेत अनेक चोऱ्याचे तपास प्रलंबीत असल्याने चोरटयाचे मनोबल वाढले पोलीसांनी चोरांचा बंदोबस्त करावा
शेतकरी वैभव देशमुख निरोड