घटना

तामगाव स्मशान भुमि समोर २५ वर्षीय युवका कडून मोठा चाकु कुकरी जप्त तामगाव पोलीसांची कारवाई 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तामगाव पोस्टे हद्दितील तामगाव बोडखा रोडवर स्मशान भुमि समोर एक २५ वर्षीय युवक मोठा चाकु अदखल पात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वता जवळ बाळगुन होता तामगाव पोलीस पेट्रोलींग करतांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन तामगाव पोलीसांनी घटना स्थळी दाखल होऊन सदर युवकाची झळती घेतली असता त्याच्या जवळ विना परवाना अवैध मोठा चाकु कुकरी मिळून आल्याने तामगाव पोलीसांनी मोठा चाकु कुकरी जप्त करुन सदर आरोपीला ताब्यात घेतले
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तामगाव पोलीस पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि तामगाव गावलगत बोडखा डाबरी रसत्याच्या बाजुला स्मशान भुमी समोर दि ८ जुलै रोजी रात्री ११ वाजता एक ईसम काळ्या रंगाची टि शर्ट घातलेला त्याच्या जवळ मोठा चाकु कुकरी असुन अदखल पात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा आहे तामगाव पोस्टेचे पो हे कॉ उमेश दयाराम बोरसे व पोलीस कर्मचारी सुनिल वावगे यांनी पंचा सक्षम आरोपी विशाल रामलाल बच्चीरे  रा रोहिदास नगर मलकापुर यांच्या अंगझडती घेतली असता कमरपटट्याला आडवा अटकविलेला लेदर कवर व स्टीलची मुठ असलेला मोठा चाकु कुकरी किंमत १ हजार रुपये मिळून आला चाकु कुठून आनला असे विचारले असता एका वर्षा पुर्वी १ व्यक्तीकडून विकत घेतले व परवाना बाबत विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले आरोपी विशाल रामलाल बच्चीरे रा मलकापुर याच्या कडून मोठा कुकरी चाकु जप्त करुन सदर आरोपीला ताब्यात घेतले पो हे कॉ उमेश दयाराम बोरसे यांच्या फिर्यार्दी वरुन आरोपी विशाल रामलाल बच्चीरे याच्या विरुध्द कलम ४२५ शस्त्र अधिनियम अंतर्गग कारवाई केली सदर आरोपीला तामगाव पोलीसांनी संग्रामपुर न्यायालयचे न्यायधिश समोर हजर केले असता आरोपीला न्यायधीश यांना न्यालयीन कोठडी सुनावली तामगाव पोलीसांनी बुलढाणा कारगृहात रवानगी केली तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक फौजदार रामकिशन माळी करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak