त्या अनोळखी ईसमाची प्रॉपर्टीच्या वादातुन मुलानेच मित्राच्या सहाय्याने गळा आवळून केला वडिलाचा खुन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील काटेल वडगाव दरम्यान वाननदि पात्रात १ आठवड्या पुर्वी वाननदि पात्रात काटेल शिवारात अनोळखी व्यक्तीचे प्रेत दफन केल्याची घटना घडली होती सदर घटनेतील व्यक्ति दानापुर येथील अशोक विष्णु मिसाळ असल्याची व प्रॉपर्टी जमीन व प्लाट मुलाच्या नावाने करित नाही व याच कारणा वरुन वाद होता चिडून जावुन मुलगा प्रविण उर्फ शुभम मिसाळ व त्याचा मित्र राहुल रामदास दाते दोघे रा जामोद या दोघांनी अशोक मिसाळ यांची झोपेत गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले याबाबत हकिकत असे प्रकारे आहे १ आठवड्या पुर्वी काटेल शिवारात वान नदि पात्रात अनोळखी व्यक्ती दफन केले सदर व्यक्ती सडलेला आहे अशी माहिती तंटामुक्त अध्यक्ष थोरात यांनी तामगाव पोलीसांना दिल्या वरुन ठाणेदार राजेन्द्र पवार , पो उप नि विलास बोमटे , बीट जमादार अशोक वावगे , हे कॉ रामकिसन माळी , पो कॉ विकास गव्हाड पोलीस ताफा घटना दाखल झाल्या नंतर प्रेत बाहेर काढून पंचनामा केला . प्रेत हे पुर्ण सडल्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता, प्रेताचे अंगावर असलेल्या मळकट पांढऱ्या रंगाचे शर्टाचे कॉलरवर कुले टेलर्स दानापुर असे लेबल दिसले. त्यानंतर सदर अनोळखी पुरुष इसमाचे प्रेताचे जागीच श्वविच्छेदन करून प्रेताचा काटेल येथील हिंदु स्मशानभुमीमध्ये रितीरिजावाप्रमाणे दफन विधी करण्यात आला. त्यानंतर संतोष श्रीराम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोलीस स्टेशन तामगांव येथे मर्ग दाखल करुन कलम १९४ बि.एन.एस.एस. अन्वये दाखल करुन चौकशी पोउपनि विलास बोपटे यांचेकडे देण्यात आली.त्यानंतर ठाणेदार सपोनि राजेंद्र पवार यांनी आपली तपास चक्रे फिरवून स्वता व पो कॉ विकास गव्हाड यांचेसह दानापुर गावात जावुन मृतकचे शर्टावर असलेल्या लेबलवरुन कुले टेलर यांचेकडे जावुन शर्ट व मृतकचे फोटो दाखवुन चौकशी केली असता सदर टेलर यांनी ते शर्ट स्वत शिलाई केलेले असुन रजीष्टरची पाहणी केली असता शर्ट हे गावातीलच अशोक विष्णु मिसाळ यांचे असल्याचे फोटो पाहुन सांगीतले. त्यावरुन अशोक विष्णु मिसाळ यांचे घरी जावुन पाहणी केली असता सदरचा इसम हा मागील तीन ते चार दिवसांपासुन गावात नसल्याचे नातेवाईकांकडुन कळाले. त्यावरुन सदर इसमाचे नातेवाईकांना सविस्तर विचारपुस केली असता शनिवार दि. १३ जुलै रोजी दुपार दरम्यान अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ रा. जामोद ता. जळगांव जा जि. बुलढाणा हा भेटीसाठी आला होता व रात्रभर अशोक मिसाळ यांचे सोबत हजर होता व दुसरे दिवशी परस्पर कोणालाही काही न सांगता जामोद येथे निघुन गेला व तेव्हापासुनच अशोक मिसाळ हे सुध्दा गायब असल्याचे सांगीतले. अशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासुन मागील विस वर्षांपासून वेगळे एकटेच राहत होते. अशोक मिसाळ हे त्यांचे नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाचे नावावर करुन देत नव्हते. तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत अशोक मिसाळ व त्याचा मुलगा प्रविण उर्फ शुभम याचेसोबत नेहमी दानापुर येथे आल्यावर दोघात वाद होत होते त्यावरुन प्रविण मिसाळ हा दि. १३/०७/२०२४ रोजी दुपारपासून रात्रीपर्यंत दानापुर येथे हजर होता व याअगोदर सुध्दा त्याने अशोक मिसाळ याचेसोबत प्रॉपटी वाटप करण्याचे कारणावरुन वाद केल्याचे निष्पन्न झाले व प्रॉपर्टी वादातुन वडिल अशोक विष्णु मिसाळ यांचा मुलगा प्रविण उर्फ शुभंम अशोक मिसाळ व त्याचा मित्र राहुल रामदास दाते दोघे रा जामोद ता जळगाव जा यानी दानापुर येथे अशोक मिसाळ झोपेत असतांना गळा आवळून खुन केला व मृतकाची प्रेत दुचाकीने काटेल शिवारात वाननदि पात्रात पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने दफन केल्याचे निष्पन्न झाले दि. २१/०७/२०२४ रोजी सदर मर्गमध्ये अपराध क्र. २३६/२०२४ कलम १०३ (१), २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा करुन गुन्हयांचा तपास पोउपनिरिक्षक जिवन सोनवणे यांचेकडे देण्यात आला,
त्यावरुन पोउपनि जिवन सोनवणे, पो कॉ विकास गव्हाड, पोहवा प्रमोद मुळे यांनी मोठ्या गुन्हयांत फरार असलेला प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ रा. जामोद यांस मोठ्या शिताफीने पकडले. त्यास मृतकचे फोटो तसेच शर्ट दाखविले असता ते अशोक मिसाळ याचे असल्याचे ओळखत नव्हता तसेच त्याचे वडील अशोक मिसाळ हे पंढरपुर येथे वारीकरीता गेले असावे असे नेहमी अडखळत सांगत होता, त्यावरुन त्याचे बोलण्यावर पोलीसांना दाट संशय आल्याने विश्वासात घेवुन त्यास पोलीसांचे भाषेत प्रश्न विचारताच तो पोपटासारखा बोलु लागला, त्याने पोलीसांसमोर प्राथमिक माहिती दिली की, त्याचे वडील अशोक विष्णु मिसाळ वय ५० वर्ष रा. दानापुर हे आमचेपासून विस वर्षापासुन वेगळे राहत असुन आम्हाला वागवित नव्हते. तसेच प्रॉपटींचा हिस्सा सुध्दा देत नव्हते. त्यावरुन लगेच जामोद येथील राहुल रामदास दाते वय २५ वर्ष यांस पकडुन पोलीस स्टेशनला आणले व त्याने सुध्दा प्रविण उर्फ शुभम मिसाळ यांचे सोबत खून केल्याची कबुली दिली, गुन्हयांतील आरोपी नामे प्रविण उर्फ शुभम अशोक मिसाळ वय २४ वर्ष , राहुल रामदास दाते वय २५ वर्ष दोन्ही रा. जामोद ता. जळगांव जा. जि. बुलढाणा यांना गुन्हयांत अटक करुन जेलबंद केले. याबाबत तामगांव पोलीसांनी रात्रदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे अनोळखी मृतकाची ओळख पटुन मृत्युचे कारण उघडकीस येवुन गुन्हेगार गजाआड झालेत.सदर प्रकरणामध्ये जि पोलीस अधिक्षक सुनिल कडासने अप्पर पो अधिक्षक . अशोक थोरात उपविभागीय पो अधिकारी. ङि एस गवळी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन तामगांव येथील ठाणेदार सपोनि राजेंद्र पवार, पोउपनि विलास बोपटे, पोउपनि जीवन सोनवणे, सहायक फौजदार , पोलीस हवालदार रामकिसन माळी, अशोक बागवे, प्रमोद मुळे, पोकॉ विकास गव्हाड, पोको संतोष मेहेंगे, चालक पोहवा संतोष आखरे, चालक पोशि वावगे, चालक पोशि सेवानंद हिवराळे यांनी अथक परिश्रम घेवून गुन्हा उघडकीस आणला हे मात्र विशेष