पातुडर्यात भव्य रोग निदान व शिबीरात १५० गरजु रुग्णाची तज्ञ डॉक्टरां कडून मोफत तपासणी औषधोउपचार २५ रक्तदात्यांचे रक्तदान
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील सेवा निवृत्त मुख्यध्यापक फकिरचंदजी राठी यांच्या प्रथम स्तृतीदिना निमित्त श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका व राठी चौधरी परिवार पातुर्डा यांच्या संयुक्त विदमाने भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन दि २५ जुलै गुरुवार रोजी सरस्वती वाचनालय सभागृह बालाजी मंदिर जवळ पातुर्डा येथे करण्यात आले होते भव्य रोगनिदान शिबीरात जे जे हॉस्पीटचे त्वचा रोग सौदर्य तज्ञ डॉ प्रफुल वाघाडे , स्त्रिरोग वंध्यत्व निवारण तज्ञ अकोला डॉ मनिषा कासट राठी, दत्तरोग अस्थमा ॲलर्जी तथ डॉ राम देवळे, फिजीशीयन हूदयरोग मधुमेह तज्ञ डॉ धनंजय मारोडे , भव्य रोग निदान शिबीरात तज्ञ डॉक्टर यांनी १५० रुग्णांची तपासणी करुन औषोध उपचार योग्य मार्गदर्शन केले तर २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले अकोला येथील बल्ड बॅकेचे आरोग्य सेवक यांनी रक्त संकलन केले पातुर्डा परिसरातील गरजु रुग्णांनी रोगनिदान शिबीराचा लाभ घेतला यावेळी श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका पदाधिकारी व राठी चौधरी परिवारातील सामाजीक कार्यकर्ते रमण राठी , ॲड लक्ष्मीनारायण राठी , अशोक राठी , शैलेज राठी, रामदेव बाबा मेडिकलचे संचालक दामोधर राठी , प्रा भुषण राठी , आरोग्य मित्र विठ्ठल पाखरे , अंजली तेलगोटे , विष्णु गांधी यांनी सहकार्य केले , यशस्वीते साठी शरद मेतकर , अभिषेक नायशे हिमांशु राठी , व राठी परिवार यांनी प्रयत्न केले