अल्पसंख्यांक समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बार्टीच्या धर्तीवर मार्टीला कॅबिनेटची मंजुरी ठिक ठिकाणी आनंदोत्सव करत अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार
संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी धर्तीवर मार्टीला कॅबिनेटची मंजुरी ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यशआले मौलाना आझाद विचार मंच सह मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी ठिकठिकाणी आंदोत्सव साजरा करित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे बुलडाणा जिल्ह्यात मौलाना आझाद विचार मंच व अल्पसंख्यांक संस्था विविध राजकिय पक्षाचे मुसलीम नेत्यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी टार्टी , बॉर्टी , सारथी , महाज्योती , अमृतच्या धर्तीवर एमआरटीआय स्थापना करण्याची एकमुख मांगणीसाठी तालुका निहाय वेळोवेळी धरणे आंदोलन तसेच बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्यव्यापी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले मौलाना आझाद विचार मंच संस्थापक अध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वात पदाधिकारी महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मुसलीम नेत्यांनी राज्यपाल यांची प्रत्येक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले होते त्यात महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे
अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी, यावर्षी मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुसलीम अल्पसंख्यांक समाज बांधवाचा मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्यातील मुसलीम समाज बांधव तसेच अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा सर्वागींण विकासाला चालना मिळेल एवढे मात्र खरे
मार्टीला मंजुरात बुलडाणा जिल्ह्यात मुसलीम समाज बांधवा कडून आंदोत्सव
अल्पसंख्यांक समाज बांधवाचा शैक्षणीक आरक्षण सरंक्षण सह सर्वागिंण विकास मुख्यप्रवाहातसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने बुलडाणा येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करून मौलाना आझाद विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष खा हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वात शिष्ट मंडळाने राज्यपाल यांना निवेदन दिले होते अल्पसंख्यांक संस्था विविध संघटनेच्या मांगणी दखल व उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजीत पवार यांच्या पुढाकाराने राज्य कबिनेट मंत्रिमंडळात मार्टीला मंजुर मिळाल्याने कॉग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हाजी मुज़म्मील खान , राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी, कॉग्रेसचे जेष्ठ नेते हाजी रशीद खा जमादार , बाबु जमादार ,वासिक नावेद , ॲड शाहिद शेख , ॲड शेख सलीम , ईब्राहिम खान, सऊद खान , डॉ मो अमिन , डॉ अनिस , ईरफान पठाण यांच्या सह मौलाना आझाद विचार मंचचे जिल्ह्यात राज्यव्यापी मुसलीम समाज बांधवांच्या सहकार्याने २ वर्षात विविध आंदोलनाचे फलीत म्हणुन मुसलीम समाज बांधवांनी आंदोत्सव साजरा करित उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आभार मानले