महाराष्ट्रविशेष बातमी

गल्ली बोळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नप ची दुचाकी अग्निशमन यंत्रणा सज्ज

देऊळगाव राजा प्रतिनिधी :- राज्य शासनाने अग्नी सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषदेला अधिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपाय अमलात आणत असून अत्याधुनिक अग्निशमन वाहन बरोबरच आता भविष्यात एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर मोठे वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी अग्नीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता राज्य शासनाने राज्यातील सर्वच नगरपरिषदेला दुचाकी वर (बुलेट)अग्निशमन यंत्रणा बसवून गल्लीबोळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे सात ऑगस्ट रोजी नगरपालिका प्रशासन संचलनालय मुंबई यांच्याकडून सदर अध्ययावत दुचाकी वाहन नगरपरिषदेला प्राप्त झाले असून त्याचे विधिवत पूजन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभारी आरोग्य निरीक्षक विशाल वाघ व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते
याबाबत सविस्तर असे की राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेला अग्नि सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत अद्ययावत अग्निशमन वाहन पुरविण्यात आलेले आहे त्यानंतर राज्य शासनाचे असे लक्षात आले की गल्लीबोळात एखाद्या वेळेस आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचू शकत नाही त्यासाठी ३५० सीसीच्या दुचाकी (बुलेट)वर अध्ययावत असे अग्निशमन यंत्र बसवून त्याद्वारे गल्लीबोळात लागलेल्या आगीवर या दुचाकीद्वारे नियंत्रण मिळवता येईल त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेस 24 किलो वाटर फोम ,दोन फायर सिलेंडर, फायर पंप 50 फूट, त्यावर जनरेटर सेट अशी अद्ययावत बुलेट दुचाकी तयार करून पाठवण्यात आलेकी आहेत सदर अद्ययावत अग्निशमन यंत्रणा असलेल्या दुचाकीचे पूजन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे हस्ते करण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक विशाल वाघ लेखापाल संजय जाधव अंतर्गत लेखापरीक्षक संदेश तायडे अग्नीशमन दुचाकी चालक भगवान मापारी रोहित गोरे रामकिसन खंडागळे रा.ब. गोरे ,बी.एम. भगत, श्रीकांत चिकले दत्ता मंडळकर ,भाऊसाहेब साबळे कैलास सुनगत, सुभाष पौळकर, आदी उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak