Blog
तेली समाज बांधवांनी केला आ डॉ संजय कुटे यांचा सत्कार
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील बावणबीर संताजी जगनाडे महाराज मंदिर सभागृहा बांधकामासाठी आ डॉ संजय कुटे यांच्या कडे भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्याम आकोटकार यांनी पाठ पुरावा केल्याने आ डॉ संजय कुटे यांनी संताजी जगनाडे मंदिर सभागृहासाठी ५० लक्ष रूपये निधी मंजुर केल्या बद्दल बावनबीर येथील तेली समाज बांधवानी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ संजय श्रीराम कुटे यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला
तेली समाज चे आराध्य दैवत मानवता लोक कल्यानाची शिकवण देणारे महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे बवणबीर येथे सामाजिक सभागृह बांधकाम व इतर बाबी साठी आ डॉ संजय कुटे यांनी 50 लक्ष रु चा निधी मंजूर केला आहे लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने.तेली समाज बांधवांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला तर आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा तेली समाज बांधवांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले या वेळी डॉ आकोटकार, सुतगिरणी चे संचालक गणपतराव आकोटकार, सेवानिवृत्त पोष्ट मास्तर मधुकरराव आकोटकार, तालुका खरेदी विक्री संस्थेचे संचालक गणेश आकोटकार, बावनबीर सहकारी संस्थेचे संचालक प्रल्हाद मनसुटे, नांदुरा अर्बन बँकेचे स्थानिक संचालक राजेंद्र आकोटकार,सुभाष आकोटकार,दिपक ढवळे, योगेश तिखीले,मयुर आकोटकार,संतोष निवाणे, श्रीकांत आकोटकार, सचिन आकोटकार,मोहन खोडे, अभिषेक ढवळे भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश पुंडे, रामा घायल उपस्थित होते.