महाराष्ट्र

जाहिर नोटीस

आमचे पक्षकार नामे 1) चेतन गोपालदास शर्मा, 2) शेख अफरोज शेख आसिफ, दोघे रा. सोनाळा ता.संग्रामपुर जि. बुलढाणा तर्फे सर्वत्र जनतेस सुचीत करण्यात येते की 1) विलास सुधाकर पाटील रा. पातोंडी ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खां.2) गजानन त्र्यंबक पाटील, रा. भुसावळ रोड, कुसुमश्री हॉस्पीटल समोर, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खां. यांच्या मालकीची मौजे सातोड ता. मुक्ताईनगर येथील शेत भुमापन क्रमांक व उपविभाग 38/4/49 एकुण क्षेत्रफळ 9हे. 75 आर आकार रुपये 0.85/-पैकी हिस्सा 0हे.80 आर व पोट खराब 4हे. 87.50 आर शेतजमीनतसेच मौजे सातोड ता. मुक्ताईनगर येथील शेत भुमापन क्रमांक व उपविभाग 38/4/44 एकुण क्षेत्रफळ १हे. 17 आर आकार रुपये 23.45/-पैकी हिस्सा 4हे.58 आर शेतजमीन विक्रीचा नोटरीसमक्ष सौदाचिड्डी कायम केला आहे. सदरहु वरील व्यवहारा प्रमाणे आमचे पक्षकार सदर शेतीचे खरेदीखत करुन घेण्यास तयार आहेत.

तरी सर्व जनतेच कळविण्यात येते की, सदरहु वर वर्णन केलेल्या दोन्ही मिळकतीबाबत कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क, वारसा, मालकी हक्क, ताबा, बोजा, बक्षीस, गहाण, मेहर, तोंडी, खरेदी व्यवहार तसेच कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु नये, केल्यास सदरहु व्यवहार हा आमचे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही. वर वर्णन केलेल्या शेत मिळकतीबाबत कोणी कोणत्याही स्वरुपाचा व्यवहार केल्यास त्यावर आमचे पक्षकार सक्षम दिवाणी व फौजदारी कार्यवाही करतील. आमचे पक्षकार यांना नोटरी समक्ष करुन दिलेल्या सौदाचिठ्ठीनुसार/ करारानुसार शेतीचे रजि. खरेदीखत नोंदवुन घेतील व त्यानंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, उजर वा आक्षेप चालणार नाही यांची नोंद घ्यावी. करीता ही जाहिर नोटीस. दि. 26/03/2026

स्वा/-
पक्षकाराकरीता अधिवक्ता

अॅड.एस.आर.मानकर

मु.पो.ता.जळगाव जा.जि.बुलडाणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!