पिप्री काथरगाव ग्रा पं च्या वतीने कोलकत्ता येथे महिला डॉक्टर, अकोला , बुलडाणा येथील चिमुकलीवर अत्यचार निषेधार्थ कॅन्डल मार्च
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पिप्री काथरगाव गट ग्राम पंचायतच्या लोकनियुक्त सरपंचा सुवर्ण गणेश टापरे यांच्या संकल्पने ग्रा प कार्यालयात महिला व शालेय विद्यार्थ्याची बैठक घेऊन देशात महिला शालेय विद्यार्थीवर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना झालेले अत्यचार संदर्भात चिंता व्यक्त करित अत्यचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा व कठोर कारवाईची मांगणी करत कोलकत्ता , अकोला , बुलढाणा , जिल्ह्यातील महिला शालेय विद्यार्थ्यावर झालेल्या अत्यचारचा निषेध करुन सरपंच सुवर्ण गणेश टापरे यांच्या नेतृत्वात गावातील महिला व शालेय विद्यार्थ्या सह कोलकत्ता येथे महिला डॉक्टर व ठाणे जिल्ह्यातील बदलापुर व बुलडाणा जिल्ह्यातील वर्दळ चिकुकलीवर तसेच अकोला जिल्हयातील काझीखेड येथील मुलीवर झालेल्या अत्यचार प्रकरणी निषेधार्थ कॅन्डल मार्च गावातुन काढण्यात आला या दरम्यान विद्यार्थ्यानी व महिलांनी हातात फलक घेऊन नरधामाना कठोर शिक्षा करा फाशी द्या निषेध असो निषेध असो नरधामाचा निषेध असो आदि घोषणा देत परिसर दणाणुन गेला होता
यावेळी माजी सरपंच गिताबाई हातेकर, ग्रा पं सदस्य प्रिया गोल्हर , शकुंतला बावस्कर, ज्योती कंकाळ, मिराबाई चव्हाण, वंदना डाखोडे, अनिता हातेकर , चित्रा बिलेवार, सुनंदा गोल्हर, शिला हातेकर, रेखा डाखोडे, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते