मनोरंजन

खरे कलावंत लाभार्थी शासकिय मानधाना पासुन वंचीत चाचणी विमा कलावंताचा गंध नसलेले अपात्र लाभार्थीना मात्र मानधानचा लाभ शाहिर श्रीकृष्ण हातेकर

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बहुजन समाज कलावंत सेवाभावी संस्था तामगाव संग्रामपुर मार्फत शासनाच्या विविध योजने संदर्भात शासकिय निकषा नुसार लोककलेतुन आपल्या कलागुणांच्या जोरावर गाव निहाय पाणी अडवा पाणी जिरवा , स्वच्छता अभियान , दारुबंदी , वृक्षतोड थांबावी , पर्यावरण संतुलन राखणे , मतदान जन जागृती , सांस्कृतीक गितांच्या माध्यमातुन समाजप्रबोधन कार्यक्रम लोकहितार्थ जनजागृती करित असताना मात्र खरे कलावंत लाभार्थी शासकिय मानधाना पासुन वंचीत तर चाचणी विमा कलावंताचा गंध नसलेले अपात्र लाभार्थीना मात्र मानधानचा लाभ देण्यात येत असल्याचा आरोप शाहिर श्रीकृष्ण हातेकर यांनी तालुका कलावंत बैठकी दरम्यान केला समाज कल्याण कलावंत विभागाचे संबंधीत अधिकारी कोणतेही निकष न लावता कलावंत मानधान यादी मध्ये अपात्र कलावंताचे नावे समाविष्ठ करण्याचा प्रकार सर्रास सुरु असल्याने हाडाचे कलावंत उपाशी व उपेक्षित तर कलावंताचा गंध नसलेले शासकीय कार्यक्रम सादर न केलेले कोणतेच शासकीय प्रमाण पत्र नसलेले कलावंतांची मानधानास पात्र नसतांही अश्या कलावंता ची निवड व लाभ दिला जात आहे मात्र खरे कलावंत लाभार्थीवर अन्याय नव्हे काय असा प्रश्न शाहिर हातेकर यांनी संग्रामपुर तालुका कलावंताच्या वतीने उपस्थित केला यानंतर बहुजन समाज कलावंत सेवाभावी संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हातेकर यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी मार्फत जिल्हा समाज कल्याण यांना विविध मांगण्याचे निवेदन देण्यात आले त्यात वृध्द कलावंत साठी जिल्हा समिती गठीत करा , कलावंताचा गंध नसलेल्या कलावंताची निवड होत असल्याने शासकीय प्रमाण पत्राची अट रद्द करा , वृद्ध कलावंतची वय मर्यादा २० वर्ष करा , कलावंताचे मानधान १० हजार करा व प्रत्येक महिण्याच्या ५ तारखेला द्या , तालुका निहाय कलावंताची निवड चाचणी घ्या , शासकीय प्रमाण पत्र प्राप्त कलावंतांना शासकीय ओळख पत्र द्या, वृद्ध पात्र कलावंतांना शासकिय घरकुल द्या , कलावंत कला सादरी करण करतांना आकास्मित नैसर्गिक मुत्यू झाल्यास १ लक्ष रुपायाचे तात्ळीची आर्थिक मदत शासनाने द्यावी विविध मांगण्या समाज कल्याण विभाग शासनाने मंजुर कराव्या यापुर्वी संबंधीत विभागाला विविध मांगण्याचे निवेदन दिले मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने तात्काळ उपरोक्त मांगण्या समस्या न सोडविल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय समोल आंदोलन छेडण्याचा ईशारा बहुजन समाज सेवाभावी बहुद्देशीय संस्था तामगाव अध्यक्ष शाहिर श्रीकृष्ण हातेकर , अंबादास राजनकर , ओंकार दामले , लक्ष्मण बांगर , प्रल्हाद वानखडे , कोकीलाबाई गावंडे , बळीराम पारिसे , गणेश वानेरे, वर्षा वानखडे , छाया बोदळे , जगन्नाथ तायडे , श्रीकृष्ण गायकी , जगन्नाथ दामदर , सुनंदा गिऱ्हे , सह तालुक्यातील कलावंतांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak