संग्रामपुर तहसिलदार योगेश्वर टोंपे यांची बदली तर नविन तहसिलदार प्रशांत पाटील रुजु होणार
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील तहसिल कार्यालयात रुजु झाल्या पासुन कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी शेतकऱ्यां सह सर्व सामान्यांचे विविध समस्या मार्गी लावल्या तहसिल टोंपे यांची यापुर्वी बदली झाली होती त्यामुळे शेतकरी नागरिकांनी बदली रद्द करण्यासाठी मांगणी प्रशासन शासनाकडे केली होती नुकतेच दोन दिवसापुर्वी तहसिलदार टोंपे यांनी अपंग, विधवा , परिपक्ता , वृध्पकाळ योजने अंतर्गत संजय गांधी निराधारचे प्रलंबीत चारशेच्यावर प्रकरण मंजुर केले शेतकऱ्यांच्या खात्यात शासकिय अनुदान साठी के वाय सी करुन घेत शासकिय अनुदान संबंधीत शेतकऱ्यांच्या वर्ग करण्यासाठी जातीने लक्ष दिले शालेय विद्यार्थ्याच्या प्रवेश प्रक्रिया साठी तहसिल संबंधीत दाखले विना विलंब देण्याचा प्रयत्न ते करित त्यामुळे जनतेचे आवडते अधिकारी म्हणुन ओळखले जात होते तसेच तालुक्यातील मोठ्या गावात स्पर्धा परिक्षे संदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणारे एकमेव महसुल अधिकारी तहसिलदार टोंपे यांनी प्रशासना कडे बदलीसाठी विनंती केली होती त्यांची विनंती वरुन नांदेड जिल्ह्यात बदली झाली तर संग्रामपुर तहसिल कार्यालयाला नविन तहसिलदार प्रशांत पाटील यांची नियुक्ती झाल्याने उद्या नविन तहसिलदार प्रशांत पाटील रुजु होणार व तहसिलदार टोंपे यांच्या कडून पदभार स्विकारणार आहेत