निकोप सेवेची जबाबदारी आरोग्य घटकांवर सहाय्यक आयुक्त घिरकेसंग्रामपूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्याती व परिसरातील औषध विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांच्या वतीने आयोजीत संग्रामपुर येथे डॉक्टर व औषध विक्रेते यांना कायदे विषयक मार्गदर्शन बैठकी दरम्यान शुक्रवारी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी निकोप सेवेची जबाबदारी आरोग्य घटकावर असल्याचे सागुन कायदे विषयक विस्तृत मार्गदर्शन केले.
औषधी विक्री करताना कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे . यात ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1945, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट ,मेडिकल डिवायसेस नियम 2017, नारकोटीक ॲन्ड सायकोट्रापीक संबंधीत कायदा या महत्वाच्या विषयावर आयुक्तांनी सखोल मार्गदर्शन केले . समाजाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी औषध विक्रेत्यांची आहे. नवी पिढी नशेकडे वळू नये, नशेची औषधें प्रिस्क्रीप्शन शिवाय विकू नये. औषध विक्री व साठवणूक चा अधिकार फार्मासिस्टना आहे. डॉ कडून सेड्युल के चे पालन झाले पाहिजे असे कायदा सांगतो. सॅम्पल विक्री करु नये. ठोक औषधी विक्रेत्यांनी डॉक्टरांना औषध विक्री करू नये. याबाबत प्रशासन गंभीर असुन यात कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. अगदीच अपरिहार्य असेल तरी नियम पुर्णतः पाळले गेलेचे पाहिजेत. याबाबत कडक कारवाई सुरू असून कायदा जाणून घेतल्यास त्याचे पालन सोपे होईल. कायद्याने डॉक्टर व फार्मसिस्ट ची नियमावली सुस्पस्ट केली आहे. दोघांनीही याचे भान ठेवावे.
औषध विषयक कोणत्याही गोष्टीसाठी आपण अन्न औषध प्रशासनाच्या वेबसाईट वरून तथा कार्यालयाकडून माहिती घेऊ शकता. असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पदाधिकारी पांडुरंग इंगळे, प्रमोद टाकळकर, उमेश इंगळे यांच्यासह तालुक्यातील शंभर टक्के उपस्थिती होती.
यावेळी सँपल विक्री,औषधे थेट डॉक्टरांना विक्री करणे, याबाबत कडक अंमलबजावणी सुरु आहे. या बाबतीत माहिती दिल्यास कारवाई केली जाईल. गर्भपात व उत्तेजक औषधांचा अतिशय काळजीपूर्वक वापर करुन यांचा गैरप्रकार तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखणे या सारख्या शासनाच्या धोरणाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय अनेक गैरप्रकार रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त गजाननजी घिरके यांनी केले.
बॉक्स
औषध विक्रेते व डॉक्टरांनी कायद्याचे पालन करावे
घाऊक विक्रेत्यांनी कायद्याच्या चौकटीतच आपला व्यवसाय करावा. डॉक्टरांना थेट औषध पुरवठा करने टाळावे. डॉक्टरांनी नी सुद्धा आपली आवश्यक असलेली मागणी लिखित स्वरूपात नोंदवावी व बिलाप्रमाने औषध साठा खरेदी करा. विनाबिल औषधी घेणे, विकणे, साठवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यात कडक कारवाई चे प्रावधान आहे.
याची जाणीव ठेवून समाजाला निकोप सेवा देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. डॉक्टर व फार्मसिस्ट यांनी नियमानुसार कार्य करावे असे कायद्याला अपेक्षीत आहे.
गजानन घिरके
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा