Blog

पातुर्डा बु , वरवट खंडेराव येथील पाण्याची टाकीचे भुमिपुजन संपन्न

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा व वरवट खंडेराव येथील पिण्याच्या टाकी साठी पातुर्डा फाटा कृषि विभागाच्या कृषि बीज प्रक्रिया केंन्द्र वरवट खंडेराव गट नं११७ मधील १५०० शे चौ मीटर जागा  माजी मंत्री जळगाव जा मतदार संघाचे  आमदार डाँ संजय कुटे यांच्या पाठ पुराव्यामुळे मंजुरात मिळाली  मतदार संघातील तालुक्यातील गावे ही आमदार संजय कुटे यांनी सतत पाठपुरावा केला व जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावातील नवीन पाईप लाइन  मंजुरात करून घेतली तालुक्यातील पातुर्डा बु गावाची लोकसंख्या पाहता संपुर्ण गावाला पाणी पुरवठा करता यावा म्हणुन  पाण्याची टाकी मोठी व उंची वर पाहिजे या साठी ग्रा प ने  गावातील माणिक धर्माळ यांच्या पातुर्डा फाटा या रस्त्यावरील शेतातील टाकी बांधकामासाठी  विकत घेतली व त्याचा तसा करार ही केला मात्र माणिक धर्माळ यांचे निधन झाले त्यामुळे केलेला करार रद्द झाला असल्याने पातुर्डा ग्रा पं व वरवट खंडेराव या दोन्ही ग्रा पं सरपंच सदस्यानी आ डॉ कुटे यांची भेट घेऊन पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती केली व पातुर्डा येथील रहिवासी तथा भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांनी आमदार कुटे यांच्या कडे पातुर्डा फाटा येथील कृषी विभागाच्या बीज प्रक्रिया केंद्राची महाराष्ट्र शासनाच्या शेतातील जागा टाकी साठी मिळू शकते हे निर्देशनातं आणून दिले.आ कुटे यांनी संबंधित विभाग सोबत चर्चा करून पाठपुरावा केला व ती जागा मंजुरात करून घेतली पातुर्डा वासियांचा आनंदा गगण कमी पडले  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पाणी व स्वछता मिशन DWSM बुलडाणा याना कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग चे उपसचिव याच्या कडून पत्र प्राप्त झाले जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जामोद व 150 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता जळगाव जामोद व संग्रामपूर जी बुलडाणा योजनेच्या मुख्य संतुलन टाकी व 2 उंच पाण्याच्या टाकीकरिता तालुका बीज गुणन प्रक्षेत्र,वरवट खंडेराव तालुका संग्रामपूर येथील गट न 117 मधील 50×30 मी=1500 चौ मीटर 0.015 हे आर जागा उपलब्ध झाली  पिण्याच्या टाकी साठी जागा उपलब्ध झाल्याने पातुर्डा गावाला मंजुर झालेल्या टाकीचे भुमिपुजन पातुर्डा ग्रा पं सरपंच रणजीत गंगतीरे व वरवट खंडेराव सरपंचा सौ गाळकर यांच्या अध्याखाली संपन्न झाले पातुर्डा येथील मंजुर व नियोजीत जागेत टाकी बांधकाम लवकर सुरु होणार नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे कार्यक्रमाला भारत वाघ , पांडुरंग हागे , कृष्णराव राहाटे , गजानन दाणे , श्रीकृष्ण मोहनकार , साहेबराव वानखडे , ज्ञानदेव भारसाकळे , सुधाकर शेजोळे, अविनाश धर्माळ , रामदास म्हसाळ , भगवानदास राठी, रघुनाथ गाडकर , सुभाषहागे , प्रकाश पाटील, नारायण अवचार , विशाल चांडक , पवन अस्वार, मशीऊल्लाह खान , वैभव धर्माळ , आत्माराम वरवटकार , मुरलीधर निमकर्डे , मिर कुर्बान अली , पोलीस पाटील शत्रुघ्न गाळकर, शरिफ ठेकेदार , ओंकार सोनोने , गजानन क्षिरसागर , विलास गाळकर , शेख नजाकत , पातुर्डा ग्रा पं ग्रामसेवक एस पी मेहेगे, वरवट खंडेराव ग्रामसेवक सुभाषचंद्र दुबे , दोन्ही ग्रा पं चे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak