पातुर्डा बु व खुर्द ग्रा पं सरपंच सदस्यांचे ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेगे कायम ठेवण्याची मांगणी गटविकास अधिकारी यांना निवेदन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा ग्रा पं सरपंच रणजीत गंगतीरे उपसरपंच शोभाताई कृष्णराव राहाटे यांच्या सह १० ग्रा पं सदस्यांनी तर पातुर्डा खुर्द ग्रा पं सरपंच सविता रतिराम म्हसाळ उपसरपंच ज्ञानेश्वर येरुकार सह सर्व ९ ग्रा पं सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे यांची बदली न करता कायम ठेवण्यात यावे ग्रामविकास अधिकारी यांच्या समर्थनात निवेदन दिले पातुर्डा बु व खुर्द ग्रा पं ला रूजु झाल्या पासुन नियमीत चांगली सेवा देत असुन गावातुन कोणाची तक्रार नाही तसेच शासनाच्या विविध योजने अंतर्गत जातीने लक्ष देऊन पारदर्शक विकास कामे यशस्वी राबवुन पुर्ण केल्या शिस्तप्रिय शासकिय निकषा नियमा प्रमाणे आपले कर्तव्य बजावत असल्याने गावात कायदा सुव्यवस्था टिकुन आहे गावातील विकासकामे अखंडीत होत रहावी म्हणुन ग्रामविकास अधिकारी मेहेगे यांची बदली न करता कायम ठेवण्यात यावे अशी मांगणी पातुर्डा बु सरपंच रणजीत गंगतीरे ग्रा पं सदस्य , प्रशांत अढाव , दिनेश वानखडे , ग्रा पं सदस्या शोभाताई कृष्णाराव राहाटे ,छाया संजय बोपले , अरुणा विजय अढाव, अनुसया किसन बावस्कार , सुमन गजानन तायडे , गोकर्णा शेगोकार , आशा शंकर वानखडे , तसेच पातुर्डा खुर्द सरपंच सविता रतिराम म्हसाळ उपसरपंच ज्ञानेश्वर येरुकार ग्रा पं सदस्य राजु पाटील , प्रघोष झाडोकार , विठ्ठल वाघ ग्रा पं सदस्या सुजाता रविन्द्र खंडेराव , संतोषी गोपाल डांगे , नंदा विलास मानकर , या दोन्ही ग्रा पं च्या सरपंच उपसरपंच सह १९ ग्रा पं सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी मेहेगे यांना कायम ठेवण्याची मांगणी केली