दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांनी सदैव असीम प्रेम केले – आमदार संजय रायमुलकर
लोणार / प्रतिनिधी : मेहकर लोणार तालुक्यातील जनतेने माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही .त्यांना दिलेला शब्द मी पाळतो. म्हणूनच लोकांनीही भरभरून प्रेम दिले , असे विचार आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे आयोजित देवी उत्सवात व्यक्त केले.चिंचोली सांगळे येथील देवी मंडळाच्या उत्सवाची आज महाप्रसाद वितरणाने सांगता झाली. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय रायमुलकर ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, विजय सानप ,शहर प्रमुख पांडुरंग सरकटे ,विश्वंभर दराडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. देहू येथील ह.भ. प. गौरीताई सांगळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला.गणेश सांगळे, सतीश सांगळे, अर्जुन सांगळे ,बाजार समिती संचालक विठ्ठलराव जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. देवी संस्थान च्या वतीने विश्वस्त संतोष सांगळे, राजीव ओंकारराव सांगळे यांनी आमदार डॉ संजय रायमुलकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ संजय रामुलकर पुढे म्हणाले की ,संपूर्ण मतदारसंघ हा मी एक परिवार समजतो .येथील प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये ३ हजार ९०० कोटींची विकासकामे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.मी वेळोवेळी अनेकांना मदत केली, पण त्याची प्रसिद्धी करण्याच्या फंदात पडलो नाही. देवी मंदिरासाठी भविष्यात सभा मंडप बांधण्यात येईल व पुढील कार्यक्रम त्याच सभामंडपात होईल ,अशी घोषणा टाळ्यांच्या गजरात त्यांनी केली. यावेळी प्रा. बळीराम मापारी यांचेही भाषण झाले. माऊली जायभाये, गजानन जायभाये, जितेंद्र थोरवे ,विशाल थोरवे, प्रमोद थोरवे, पंढरी मानवतकर ,संतोष बोडखे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर सांगळे यांनी केले.