शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरोडेखोरांनी लुटले सोने
लोणार प्रतिनिधी : मेहकर रोडवर शारा गावा नजीक सोन्याचांदीच्या दुकानदाराला लुटले लाखो रुपयांचे सोने घेऊन चोरटे पसार शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरील शारा गावाजवळ गतिरोधका जवळ दुसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरोडोखरांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करत लोणार येथील सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली
याबाबत सविस्तर वृत्त असे की
लोणार येथील आदित्य अजितकुमार संचेती वय ४० वर्ष यांचे सुलतानपूर येथे दर्शन ज्वेलर्स आहे त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान दुकान बंद केले या नंतर ते लोणार येथे परत येत असतांना शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शारा येथील वळणावर चोरट्याने पाठलाग करत शाईन कंपनी ची गाडी आडवी लाऊन ३ जणांनी मारहान करून बंदुकीचा धाक दाखवत २७लक्ष ३१ हजाराच रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लक्ष रुपये नगदी घेऊन पसार झाले घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले लेखनिक गणेश लोढे विशाल धोंडगे जमादार संजय जाधव गोपनीय चे संतोष चव्हाण विठ्ठल चव्हाण बिट जमादार संतोष चव्हाण अनिल शिंदे गजानन डोईफोडे गजानन दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आदित्य संचेती यांना चोरट्याने मारल्याने त्यांना मार लागला असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या नंतर घटनास्थळी पोलीस पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी भेट देऊन घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते
ही लाखो रुपयांची रोड रॉबरी असल्याने याचा हा तपास लावून तात्काळ आरोपी अटक करण्याचे फार मोठे आव्हान आहे या साठी पोलिसांनी काही पथक तयार करून पाठवले असल्याची माहिती आहे लवकरच या सर्व घटनेचा तपास लावून आरोपींना जेरबंद करू असे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी सांगितले
फिर्यादी आदित्य अजितकुमार संचेती यांच्या तक्रारी वरून लोणार पोलिसांनी अझ्यात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ३०९(४)३५१(२)३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले लेखनिक नितीन खरडे करीत आहेत
सद्या लोणार शहरातील आजू बाजू च्या परिसरात चोऱ्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अश्या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करून पोलिसांनी चोरांना पायबंद घालावा जेणे करून लोणार मधील नागरिक सुरक्षित राहतील
सोबत जखमी फिर्यादी आदित्य संचेती व घटनास्थळा चा फोटो