कृषी
वरवट बकाल शेत शिवारात आगीत उसाचा फळ जळून खाक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल शेत शिवारात ३ एकर तोडणीला आलेल्या उसाच्या फळाला आग लागुन शेतकऱ्याचे उसाचे फळ व शेती उपयोगी साहित्य जळून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दि ११ एप्रिल भर दुपारी घडली तालुक्यातील एकलारा बानोदा येथील शेतकरी नथु गणपत दातार यांच्या वरवट बकाल शेत शिवारात गट क्रमांक ६२ मधील तब्बल ३ एकर क्षेत्रातील ऊस पिकांला आग लागून तोडणीस आलेला उस शेती साहित्य स्पिंकलर . ठिबक संच.पाईप या सह आदी शेती उपयोगी साहित्य अंदाजे १० लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास लागलेली आगीने रौद्ररुप धारण केल्याने सायंकाळी उशीरा पर्यंत शेतकऱ्यांनी विझविण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न निषफळ ठरले तीन एकरातील उस आगीत भस्म होऊन एकलारा बानोदा येथील नथ्थु दातार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने महसुल प्रशासनाने संबंधीत शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मांगणी शेतकरी दातार कुटुंबा कडून होत आहे



