महाराष्ट्ररोज़गारविशेष बातमी

सिद्धार्थ खरात यांनी सरस्वती कन्या विद्यालयाला दिली सदिच्छा भेट

मुलींना मोफत ब्युटी पार्लर कोर्स सुरु करणाऱ्या मुख्याध्यापिका मिनल जोहरेंचे केले कौतुक

मेहकर/प्रतिनिधि उत्कर्ष फाऊंडेशन हि एक आत्मभान आणि सन्मान जोपासून तुमच्या आमच्या उत्कर्षाची चळवळ असूनया या चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कृषी, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिता साठी उत्कर्ष फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून मेहकर-लोणार मतदार संघातील तरुण मुले आणि मुलींसाठी रोजगाराची नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे दि.१८ ऑक्टोबर २०२४ रोजी’स्किल ऑन व्हील’ हा उपक्रम अंतर्गत मेहकर-लोणार मतदार संघातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे,या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने सुशिक्षित बेरोजगारांनी उपस्थित राहावे व या भागातील युवकांना किमान कौशल्य विकास शिक्षण विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने सेवा निवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी सरस्वती कन्या विद्यालय जणेफळ या शाळेला सदिच्छा भेट दिली.या वेळी मुख्याध्यापिका मिनल जोहरे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील मुलींचा विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमार्फत मोफत ब्युटी पार्लर कोर्स सुरू करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जोहरे मॅडम यांचे सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले, या वेळी सौ फिरके मॅडम सौ गवई मॅडम श्रीमती तळेकर मॅडम,हिवरकर मॅडम, सीमाताई सरदार जानेफळ नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच रूपालीताई वडणकर वानखेडे ताई मिसाळ ताई, पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, गणेश सवडतकर,विशाल फितवे, अशोक शेजुळ आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak