यूजीसी नेट परीक्षेत शेख मतीन शेख नजीर यांचे सुयश असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी साठी झाले क्वालिफाईड
बुलडाणा [ प्रतिनिधी ] बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत देऊळघाट येथील जि. प . उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देऊळघाट येथे कार्यरत सहाय्यक अध्यापक शेख मतीन शेख नजीर यांनी यूजीसी नेट परीक्षेत इंग्रजी विषयात असिस्टंट प्रोफेसर व पीएचडी साठी क्वालिफाईड होऊन सुयश प्राप्त केला आहे. या बद्दल सहाय्यक शिक्षक शेख मतीन यांचे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिक्षक वृंद मित्र परिवाराच्या वतीने कौतुकाची थाप मारली जात आहे
या यशामुळे त्यांनी आपला, आपल्या कुटुंबाचा ,शाळेचा , गावाचा नाव उंचावला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) जून 2024 चा निकाल 17 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) च्या वतीने घेण्यात येणारी ही परीक्षा भारतीय नागरिकांची पात्रता ठरवते. ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी. परीक्षेसाठी 11 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु केवळ 6.84 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी, 4970 उमेदवार जेआरएफसाठी, 53,694 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आणि 1,12,070 उमेदवार पीएच.डी.साठी पात्र ठरले व त्यात शिक्षक शेख मतीन यांनी आपल्या मनाची एकाग्रता यशस्वी होण्याचे लक्ष ठेवुन यश प्राप्त केले हे मात्र विशेष.
UGC NET जून 2024 ची परीक्षा भारतातील 280 शहरांमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 21 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत 11 दिवसांची होती, ज्यामध्ये 21 शिफ्टमध्ये 83 विषयांचा समावेश होता शेख मतीन शेख नजीर यांच्या या यशाबद्दल कुटुंबियांनी, मित्रांनी ,शिक्षकांनी, शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले