बुलढाणा : निवडणुका पुढ्यात आहे,अशावेळी राजकीय पक्षांनी त्यांचा अजेंडा स्पष्ट करावा, विधवां घटस्फोटीत एकल महिला साठी ते काय करणार आहेत हे जाहीरनाम्यातुन स्पस्ट करावे, आर्थिक विकास महामंडळांप्रमाणेच एकल महिला साठी एखादे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून स्वतंत्रपणे तरतूद करता यावी याकडे राज्यकर्त्यांचे व उमेदवारांचे लक्ष वेधण्यासाठी,उद्या दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रविवारी ठीक 11 वाजता सैनिक मंगल कार्यालय बस स्टँड बुलढाणा येथे विधवा घटस्फोटीत एकल महिलांचा मेळावा आयोजित केला गेला आहे. या मेळाव्यातून विधवा भगिनी राजकीय पक्षांचे लक्ष वेधले जाणार आहे.
विधवा महिला ह्या उपेक्षित घटक आहेत. त्या जश्या कुटुंबात उपेक्षित आहेत तशा त्या समाजातही उपेक्षित आहे. राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने शासन दरबारी ही त्या उपेक्षितच राहिल्या. मतदार म्हणून महिलांचा वाटा 50% आहे. त्यात विधवा महिलांची संख्या मोठ्या संख्येने आहे. असे असले तरी या विधवा महिलांच्या समस्येकडे शासन फारसे लक्ष देत नाही. राजकीय नेत्यांच्या नजरेत विधवांचे प्रश्न हे कुच कामी असतात. कुठलाही राजकीय पक्ष विधवां घटस्फोटीत एकल महिलांच्या समस्येवर बोलायला तयार होत नाही वा त्याच्या बद्दल जाहीरनाम्यात तरतूदही करीत नाही. त्या मतदार नाहीत का ? असा सवाल मानस फाउंडेशनने केला आहे.निवडणुका तोंडावर आल्या आहे. सर्वच राजकीय पक्ष त्याची तयारी करीत आहेत.अशा वेळी विधवांच्या प्रश्नांना घेऊन जाहीरनामा केल्यास विधवा घटस्फोटीत एकल भगिनी त्यांचे स्वागत करणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यासाठी व महिलांच्या प्रश्नांवर हुंकार भरण्यासाठी प्रा. डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या वतीने उद्या बुलढाण्यातील सैनिक मंगल कार्यालया मध्ये विधवां घटस्फोटीत एकल महिलचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. विधवा, परितक्ता ,एकल महिला भगिनींनी या महामेळाव्यामध्ये सहभागी होण्याच आवाहन मानस फाउंडेशनने केले आहे.
असा आहे मेळाव्याचा उद्देश
राजकीय नेतेविधवा घटस्फोटीत एकल महिला साठी
काय करणार आहे ते त्यांनी आधी स्पष्ट करावे म्हणजेच विधवांना भूमिका घ्यायला सोपे जाईल. जाहीरनाम्यात तरतूद करावी.विधवा महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही. आहे ती पेन्शनही वेळेवर मिळत नाही. याकडेही मेळाव्यातून लक्ष वेधणार आहे.
माणस फाउंडेशन राज्यभर या बाबत जनजागृती करणार आहे.