महाराष्ट्रविशेष बातमी

भारतीय संघाला आट्यापाट्या स्पर्धेत प्रदीप शिवाजी डाखोकार या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक मिळवुन दिल्या बद्दल संग्रामपुर वकिल संघा कडून सत्कार

भारतीय संघाला आट्यापाट्या स्पर्धेत प्रदीप शिवाजी डाखोकार या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक मिळवुन दिल्या बद्दल संग्रामपुर वकिल संघा कडून सत्कार

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] भूतान येथे झालेल्या भारतीय आट्यापाट्या संघात वरवट बकाल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप शिवाजी डाखोकार हा विद्यार्थी भारताकडून अंतरराष्ट्रीय आट्यापाट्या संघाकडून खेळला व भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. सदर स्पर्धा भुतान येथे दि १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर यादरम्यान येथे पार पडली. त्यामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त झाले.
आशिया खंडातील भारत, श्रीलंका भूतान, बांगलादेश या सर्व देशांर्तगत या स्पर्धा संपन्न झाल्यात. या भारतीय आट्यापाट्या संघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थी प्रदिप शिवाजी डाखोकार याचा दिवाणी फौजदारी न्यायालय संग्रामपुर वकिल संघाच्या वतीने अड चिकटे , ॲड गायकी ,ॲड वाघ सह वकिल संघाचे सदस्य यांनी शाल गुलपुष्प देऊन सत्कार केला. प्रदीपने आपल्या परिसराचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा स्पर्धां मध्ये मोठे केल्याने हि सर्वासाठी गर्वाची बाब असल्या भावना वकिल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करित प्रदिप डाखोकार याचे कौतुक केले
यावेळी प्रदीपने सत्काराला उत्तर देतांना मी सदैव संग्रामपुर दिवाणी फौजदारी न्यायालय वकिल संघाचा ऋणात राहील . यावेळी दिवाणी फौजदारी न्यायालय संग्रामपुर वकिल संघाचे अड चिकटे , अड भारत खंडेराव , अड निवृत वाघ , ॲड पि के घाटे , ॲड तौफीस बेग , ॲड गायकी, ॲड वानखडे , ॲड बावणे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak