विशेष बातमी

अखेर चिखली विधानसभा मतदार संघातील गहाळ मतदारांची नावे कायम राहणार

लोकशाही बचाव मोहिमेच्या लढ्याला यश : राहुलभाऊ बोंद्रे

चिखली : भारतीय संविधानाने देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मताला जेवढे मुल्य दिले आहे, तेवढेच मुल्य या देशातील सर्वसामान्य नागरिकाच्या मताला. मात्र चिखली विधानसभा मतदार संघात पावणेचार हजार मतदारांची नावे वगळण्याचे षडयंत्र भाजप पक्षाकडून रचण्यात आले होते. हे मतदार मतदानापासून वंचित राहिले असते तर लोकशाहीचा खून झाला असता. पण लोकशाही बचाव मोहिमेने ३७७५ मतदारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी दिलेल्या लढ्याला यश आले आहे. मतदार गहाळ प्रकरणाची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. चिखली विधानसभा मतदार संघातील माझ्या लढ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बळ दिल्यामुळे भाजपचे संपूर्ण राज्यातील मतदार गहाळ करण्याचे नियोजित असलेले षडयंत्र हाणून पाडले. भाजपचे माझ्यावरील बिनबुडाचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.बुधवार 23 ऑक्टोबर रोजी मोनी बाबा संस्थान चिखली येथे लोकशाही बचाव बैठक उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, चिखली विधानसभा मतदारसंघात ३७७५ पेक्षाही जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी फॉर्म 7 भरल्याचे आता उघड झाले आहे. याबद्दल मी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून पाठपुरावा केल्यानंतर हे लोकशाही विरोधी षडयंत्र निष्फळ ठरले. अनेक गावातून 30-40 तर काही गावातून 90-100 मतदारांची नाव कमी करण्यासाठी फॉर्म 7 भरले गेले होते.आपला लढा लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे आणि त्यासाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करू, असे आश्वासनही राहुल बोंद्रेंनी यावेळी दिले. दिलीप जाधव म्हणाले की, राहुल भाऊंनी लोकशाही मार्गाने लढा उभारल्यामुळे मतदारांना त्यांचा हक्क कायम राखता आला. तर भाई प्रदीप अंभोरे यांनी सांगितले की, हुकूमशाही प्रवृत्तीला डोके वर काढू द्यायचे नसेल तर लोकशाही मुल्ये जपणाऱ्या काँग्रेसच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे.या बैठकीला तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर,शहर अतरोधीन काझी, दिलीप जाधव,भाई प्रदीप आंभोरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, रामभाऊ जाधव, प्रा.राजु गवई सर, विकास लहाने, रिक्की काकडे, दीपक खरात, बिदुसिंग इंगळे, जय बोन्द्रे, शिवराज पाटील, समाधान आकाळ, रामभाऊ भुसारी, रमेश बोरकर, संतोष वाकोडे यांच्यासह शेकडो मतदारांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak