बी एस एफ मध्ये निवड झालेल्या जवान गणेश वानखडे याचा ग्रामसेवा सहकारी संस्थाच्या व बावनबीर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] अठरा विश्व दारिद्र्य,घरची परिस्थिती हलाखीची,पितृछत्र हरविले,आई मोल मजुरीकरून पोटच्या मुलाला मोठे करत पदवी पर्यत शिक्षण दिले त्या शिक्षणाचं चीज करत तो बावनबीर येथील गणेश वानखडे याची बी एस एफ मध्ये निवड झाल्याचे समजताच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गगणही ठेंगणे पडलेग णेशचे वडील बाळकृष्ण वानखडे यांचे निधन झाले त्या वेळेस गणेशचे वय ६ वर्ष होते.लहान पनी आपल्या मुलाच्या डोक्यावरील छत्र हरविले त्यामुळे रोज गणेशची आई काळजी करत होती,दिवसरात्र मोल मजुरी करत गणेशला लहानाच मोठं केलं.गावातील इंदिरा गांधी विद्यालयामध्ये 10 वि च शिक्षण दिले, पुढील 12 वि च शिक्षण एकलारा बानोदा येथील खोटेश्वर महाराज कनिष्ठ विद्यालय मध्ये पूर्ण केले तर पदवीसाठी सातपुडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल येथे पूर्ण केले.गणेशने लहान पणापासून घरची परिस्थिती हलाखीची पाहली आणि आईची त्याच्या बाबतींत शिक्षणासाठी तळमळ पाहिली म्हणून गणेश शिक्षणा सोबतच शासकीय नौकरी साठी तयारी करत होता आणि देश सेवा करण्यासाठी त्याला बी एस एफ मध्ये लागायचे होते म्हणून तो रोज मैदानावर सराव होता.आणि त्याच शिक्षण व कसरतचे फळ एक गरीब घराण्यातील मुलाची निवड बी ए एस एफ मध्ये झाल्याचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना माहीत पडले असता त्यांनी गणेशचा सत्कार करण्याचे ठरविले.येथील ग्राससेवा सहकारी संस्थे तर्फे जेष्ठ संचालक गोपाल अग्रवाल यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.या वेळी ग्रामसेवा सहकारी संस्थेचे संचालक निलेश काळे,रामेश्वर पुंडे,जमीरोद्दीन काजी, नागेश कांबळे,दादासाहेब टापरे सूतगिरणी चे संचालक बाळासाहेब भगत,दीपक पाटील,योगेश पुंडे,राम घायल, ग्रा प सदस्य शाहरुख पठाण, मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पोपळघट,आकाश ठाकूर यांनी स्वागत केले.या सत्कार सोहळ्याचे सूत्र संचालन भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सचिव श्याम अकोटकार यांनी केले तर प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केले.आई च स्वप्न पूर्ण केलं-गणेश वानखडेलहान पनी वडिलाच छत्र माझ्या डोक्यावरून गेलं मी तेव्हा 6 वर्षाचा होतो.मला समजत होते सर्व मात्र आई साठी काहीच करू शकत नव्हतो.माझ्या साठी आई दिवस रात्र मोल मजुरी करत मला लहान च मोठं केलं आणि 10,12 व पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून दिल.घरची जबाबदारी आता मी खांद्यावर घेण्याच ठरविलं तर आई म्हणत होती की मग इतकं शिकून काय फायदा तूला मला सरकारी नौकरी वर लागताना पाहायचं आहे.आई ला दिलेल वचन साठी मी जिद्द,मेहनत केली आणि आशिर्वादाणे मी आज बी एस एफ मध्ये लागलो व आई च स्वप्न पूर्ण केलं