जिल्हा वार्ता

पातुडर्यात सावता नगरात दुष्काळाचे भान ठेवत बाल गोपाल नवदुर्गा उत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचे विसर्जन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील पातुर्डा बु. येथील सावता नगरमधील बाल गोपाल नवदुर्गा उत्सव मंडळाने सामाजिक भान ठेवुन यंदा देवी विसर्जन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संपूर्ण मिरवणूक न काढता सावता नगर येथून राधाकृष्ण मंदिरापर्यंत पारंपरिक जुन्या वाद्यांच्या व डफळ्यांच्या गजरात देवीला निरोप देण्यात आला. सायंकाळी ठीक ६ वाजता देवीचे विसर्जन भक्तिभावाने संपन्न झाले.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि गरजू कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून उत्सवात अनावश्यक खर्च न करता मोठा गाजावाजाला मुठमाती देत  पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्याचा मंडळाचा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.“उत्सवाचा मोठेपणा मिरवणुकीच्या भव्यतेत नसून समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेत असतो,” हा संदेश या निर्णयातून देण्यात आला. धार्मिक परंपरा जपत काळानुरूप सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने सार्वजनिक उत्सवांची संस्कृती असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.दुष्काळाच्या काळात पाण्याची बचत, अन्नाची नासाडी टाळणे, शेतकरी व गरजू नागरिकांना सहकार्य करणे आणि उत्सवांमध्ये सामाजिक जबाबदारी जपणे, ही काळाची गरज आहे. श्रद्धा आणि परंपरेसोबत माणुसकीची जाणीव जपण्याचा संदेश बाल गोपाल नवदुर्गा उत्सव मंडळाच्या या निर्णयातून समाजासमोर आला.“परंपरा जपूया, सामाजिक भान राखूया आणि माणुसकीचा धर्म निभावूया!” या विचाराला अधोरेखित करत सावता नगरमध्ये देवीचा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!