सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वरवट बकालची कु ऋचा जगदीश चोखट 98% घेऊन तालुक्यातून प्रथम तसेच शाळेची 100% निकालाची परंपरा कायम यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेच्या वतीने कौतुक
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वरवट बकालच्या विद्यार्थ्यांनीमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी मध्ये उज्वल यश संपादन करून 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये कु. रूचा जगदीश चोखट ही दोन्ही तालुक्यातून 98% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकविला तर धनश्री संतोष दाभाडे हिला 96.60% गुण घेत द्वितीय तसेच मयुरी गोपाल भोंडे 96% गुण तृतीय मिळविले शाळेमधील एकूण 54 विद्यार्थी परीक्षार्थी होते त्यापैकी 50 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले व 4 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला , शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. स्वाती केला , स्थानिक संचालक मंडळ, प्राचार्य प्रकाश भुते, शाळेचे प्राचार्य योगेश घाटोळे, शिक्षक कोकाटे, राजेश लोहिया , प्रा. ज्ञानेश्वर डाबरे, रितेश पालीवाल, सुनील हागे, रामदास धूर्डे, मनीषा ढगे , कु.रुपाली पालीवाल ,प्रा. पूनम दामधर, येऊतकार ,नबा उकर्डे, मानकर व सर्व शिक्षकवृद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.