माँ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ खडकी ( अकोला ) च्या वतीने जागतिक महिलादिन उत्साहात साजरा.

अकोला [प्रतिनिधी ] येथील नेहरू नगर खडकी येथे मॉ जीजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने जागतीक महिला दिन उत्सहात साजरा करण्यात आला मॉ जीजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरवातीला कु.अनुजा सुरक्षा सचिन अंभोरे या विद्यार्थ्यांनीने महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना त्यांच्यात असलेल्या सामर्थ्य बाबत जाणीव करून देऊन आत्मविश्वास निर्माण करणे बाबत सांगितले. तर ॲड माधवी राऊत यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध कायदे बाबत माहिती दिली तसेच संविधानाचे महत्त्व उपस्थित महिलांना समजावून सांगितले. तसेच प्राध्यापक खिल्लारे मॅडम यांनी स्त्रियांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांना मान्यवरा हस्ते बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मिनू सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुरक्षा अंभोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी मॉ जीजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळाचे नयना सरदार, प्रतिभा सुरवाडे,सुरेखा कोकणे,तिलोत्तमा शेगोकार ,मोहिनी जामनिक, रमा सदांशिव , रमा सवंग यांनी प्रयत्न केले तर शुभम सुरवाडे ,संजय जामनिक,राजू सरदार ,विजय शेगोकार,बाबुराव सुरवाडे,अजय शेगोकार,आशिष सुरवाडे, डॉ आशिष कोकणे यांनी विशेष सहकार्य केले.


