
संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्या औषध माहिती केंद्र व बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानेआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पातुर्डा जिल्हा परिषद हायस्कूल सभागृहात किशोर वयीन मुली व महिला यांच्या आरोग्याबद्दल जागृती अभियान राबविण्यात आले. यात फार्मसिस्ट शुभांगी इंगळे यांनी प्रत्यक्ष समस्या विचारून त्यावर ऊपाय सुचविले. थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह यासह मासिक पाळी समस्या समस्या व निराकरण यावर विस्तृत माहिती दिली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्थापित असलेल्या विकास महिला ग्रामसंघा च्या वतीने सुद्धा किशोर वयीन मुलींना व समूहातील महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेण्यासाठी वैज्ञानिक माहिती मिळाली असून, आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली.विकास महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा दिक्षा वानखडे ग्रामसखी ज्योती आनंदा राऊत , कोषध्यक्ष मनीषा धानोरकर, सोनागरे , बाल शिवाजी इग्लीश स्कुलच्या मुख्याध्यापीका दुर्गा संतोष काळे ,पोहोकार, छाया श्रावने, संजना वानखडे, शैलजा माडीवाले, श्वेता मांडवगडे, कल्पना गावंडे, शारदा तायडे,
उज्वला भागवत, सीमा देवगिरीकर, शारदा रहाटे, मीना पारिसे, निकीता लभाने, संध्या दाभाडे , बबिता दाभाडे , उपस्थित होते. संचालन पुनम गावंडे यांनी केले तर उपस्थित किशोरवयीन मुली, विद्यार्थीनी , महिलांचे ज्योती राऊत यांनी आभार मानले
यावेळी जिल्हा परिषदे शाळेच्या विद्यार्थिनी व महिला उपस्थित होत्या.
बॉक्स
महिलांनी न लाजता न लपवता आपल्या समस्या बोलल्या पाहिजेत. लपविल्याने आजार वाढतो व न्यूनगंड येतो. निरोगी जीवनाला प्राधान्य दिलं पाहिजे
फार्मसिस्ट शुभांगी इंगळे, संग्रामपूर



