पातुर्डा येथील शिक्षीका च्या निर्दयी हत्या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षेसाठी उच्च स्तरीय पोलीस अधिकारी व सीआयडी मार्फत चौकशी करा संग्रामपुर वकिल संघाची मांगणी गृहमंत्रीना निवेदन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे कवठळ रोड पेसोडा फाट्याच्या पुढे जळगाव जामोद पोस्टे हद्दितील त्या बनावट अपघाताच्या नावाखाली दडलेला निर्दयी खुनाचा थरारक कट जळगाव जामोद पोलीसांनी उघडकीस आणला आज रोजी निर्दयी गुन्ह्यात ३ आरोपी जळगाव जा पोलीसांच्या ताब्यात आहेत पातुर्डा येथील शिक्षीका च्या निर्दयी हत्या प्रकरणी आरोपीला जास्तीत जास्त व कडक शिक्षेसाठी उच्च स्तरीय पोलीस अधिकारी मार्फत करण्यात यावी याच बरोबर सीआयडी मार्फत सखोल चौकशी करा अशी मांगणी संग्रामपुर वकिल संघाच्या वतीने संग्रामपुर तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीकडे एका निवेदना व्दारे केली आहे
तहसिलदार मार्फत गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि मृतक शिक्षिका वृषाली यांचा पती त्यांचा साथीदार दोघे रा पातुर्डा यांनी मिळून खुना कट रचना असल्याचा पोलीस तपासात निष्पंन्न झाले सदर गुन्हा हा अत्यंत निर्दयी असुन मानवतेला काळीमा फासणारी कलंकीत करणारी आहे सदर घटनेमुळे महिला सुरक्षा धोक्यात आली असुन त्यामुळे अत्यंत निर्दयी हत्या घडवुन आणणाऱ्या संबंधीत आरोपींना जास्तीत जास्त व कडक शिक्षा व्हावी असे न झाल्यास गुन्हेगार प्रवृत्तीला प्रोत्सान मिळेल गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल शिक्षीका वृषाली प्रकाश गावंडे निर्दयी हत्या प्रकरणाचा तपास उच्च पोलीस अधिकारी तसेच सीआयडी मार्फत उच्च स्तरिय चौकशी करण्यात यावी सदर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रकारे फौजदारी कट रचण्यात आला असल्याने सदर गुन्हयात अजुनही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी मृतक शिक्षिकेला व कुटुंबाला न्याय द्यावा अशी मांगणी दिवाणी फौजदारी न्यायलय वकिल संघ संग्रामपुरचे ॲड नितीन , ॲड एस टी कुरवाळे , ॲड जी ए क्षिरसागर , ॲड आर एस राऊत , ॲड पि के तायडे , ॲड वानखडे , ॲड के पी बावस्कार , ॲड एम एस किर्तने , ॲड ए एस धामोळे , ॲड निवृती वाघ , ॲड एस एस गोतमारे यांच्या सह वकिल संघ सदस्य यांनी गृहमंत्री कडे केली आहे


