वरवट बकाल गावाचा सांस्कृतिक वारसा जोपासणारी काकडा आरती तरुणांसह चिमुकल्यांचे भक्तीचे दर्शन


संग्रामपुर [प्रतिनिधी ] सालाबाद प्रमाणे आश्विन पौर्णिमेपासून काकडा आरतीला सुरुवात झाली असून वरवट बकाल गावात सांस्कृतिक वारसा जोपासणारी काकडा आरती तरुणांसह चिमुकल्यांच्या अनोख्या भक्तीचे दर्शन या गावात गेल्या ५० वर्षांपासून अखंडपणे चालू असलेली काकडा आरतीची परंपरा आजही भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाळली जात आहे. तालुक्यातील वरवट बकाल नगरीचे ग्राम दैवत श्री संत नागेश्वर महाराज यांच्या पावनभूमीत गावात सालाबाद प्रमाणे आश्विन पौर्णिमेपासून काकडा आरतीला सुरुवात झाली असून
येथे दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गावातील अबाल वृद्ध.तरुण मंडळी भल्या पहाटे गावाच्या रस्त्यावरून प्रदक्षिणा घालत भक्ती भावाने भजने गीते गायन करत गावात पहाटे भक्तीमय वातावरणात निर्माण करत काकडा आरतीचे आयोजन करतात. विशेष म्हणजे या परंपरेमध्ये गावकऱ्यांचा मोठा सहभाग असून प्रत्येक घरातील सदस्य या आरतीसाठी हजेरी लावतो काकडा आरतीची परंपरा महाराष्ट्रातील संतांनी सुरू केली आहे. ज्यामध्ये पहाटेच्या शुभ काळात भगवान विठ्ठलाच्या स्तुतीसाठी अभंग आणि भजने गायली जातात. वरवट बकाल येथील युवकांनी ही परंपरा अखंडपणे पुढे नेण्याचे व्रत घेतले आहे. त्यामुळे येथे भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळते. या आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लहान मुलेही मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होतात. ही परंपरा युवकांच्या सामूहिक सहकार्याचे प्रतीक बनली आहे. यामध्ये सर्व आबालवृद्ध एकत्र येऊन धार्मिक भावनेने जोडले जात आहेत.
दररोज पहाटे साडेचार वाजता काकडा आरतीची तयारी सुरू होते. यामध्ये सहभागी होणारे युवक आणि लहान मुले टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिरसात न्हाऊन निघतात. तसेच भजने आणि स्तोत्रांच्या निनादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होत असल्याने गावात एक चैतन्यमयी वातावरण निर्मिती होत आहे. या काकडा आरती आश्विन पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात झाली असल्याने कार्तिक पौर्णिमेला काकडा आरतीचा समारोप होणार आहे त्यामध्ये नागेश्वर महाराज ढोलाचे भजन मंडळ व श्री संत नागेश्वर महाराज सांप्रदायिक भजन मंडळ हे दोन मोठ्या मंडळे उत्साहात सहभाग घेतात



