जिल्हा वार्ताशिक्षण

मिशन परिवर्तन अंतर्गत सोनाळा पोस्टेचे दामिनी पथक सक्रिय !  टवाळखोरांनो सावधान टुनकी आदिवासी महाविद्यालयात दामिनी पथकाचे विद्यार्थीनीत जनजागृती मार्गदर्शन

मिशन परिवर्तन अंतर्गत सोनाळा पोस्टेचे दामिनी पथक सक्रिय !  टवाळखोरांनो सावधान
टुनकी आदिवासी महाविद्यालयात दामिनी पथकाचे विद्यार्थीनीत जनजागृती मार्गदर्शन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतुन मार्गदर्शनात सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांनी मिशन परिवर्तन दामिनी पथक पोलीस महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली दामीनी पथक सक्रिय झाले आहे असुन मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी पथक पोलीस महिला अमलदार आरती सावळे यांनी पथकातील आपल्या सहकारी सह सोनाळा टुनकी बस स्टॅन्ड शाळा परिसरात गस्त घालुन परिसरातील ग्रामीण भागातील प्रवास करणाऱ्या विद्यार्थीना महिलाना त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात आश्यक त्या सुचना दिल्या टुनकी येथील आदिवासी महाविद्यालयास सदिच्छ भेट देऊन विद्यार्थीनीना जनजागृती पर मार्गदर्शन करतांना दामिनी पथक महिला पोलीस अमलदार आरती सावळे म्हणाल्या कि दामिनी पथक हे महिला मुलींच्या सुरक्षेसाठी, छेडछाड रोखण्यासाठी आणि विद्यार्थीनी मुली ,महिलाना तातडीने मदत करण्यासाठी तयार केलेले महिला पोलिसांचे मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी एक विशेष पथक आहे दानिमी पथक शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी हे पथक सतत गस्त घालते तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यन्वयीत असते पॉक्सो , पोलीस भरती , डायल ११२ , बाल विवाह ,अमली पदार्थ , व्यसन मुक्ती व कायद्या विषयी जनजागृती करुन मार्गदर्शन केले दामिनी पथक महिला सुरक्षतेसाठी असुन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवर किंवा तक्रारीवर हे पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून मदत करते शाळकरी मुली महिलांनी संकटकाळी गरजे प्रमाणे स्वताच्या सुरक्षतेसाठी निर्भिड पणे गावातील सुज्ञ नागरिक , पोलीस कर्मचारी यांच्या कडे महिला सुरक्षा हेल्पलाईन नंबर किवा सोनाळा पोलीसांनी संपर्क साधा महिला मुलीच्या सुरक्षतेसाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दामिनी पथक महिला अमलदार आरती सावळे यांनी विद्यार्थीनीना दिले यावेळी पो कॉ राहुल पवार , पो कॉ संजय सास्ते , पो कॉ ईम्रान व दामिनी पथक महिला पोलीस कर्मचारी व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थीनी उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!