जिल्हा वार्ता

खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २० वर्षीय युवक वारि हनुमान वाननदि डोहात बुडून मुत्यू

खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २० वर्षीय युवक वारि हनुमान वाननदि डोहात बुडून मुत्यू

संग्रामपुर [प्रतिनिधी ] खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील मित्र वारि हनुमान मंदिर दर्शन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले निसर्ग रम्य वातारण पर्यटकांना मंदिर व वाणप्रकल्प परिसर आर्कषित करते २० वर्षीय युवक योगेश प्रकाश वानखडे त्याचे मित्रा देव दर्शन व फिरण्यासाठी आले होते हनुमान मंदिर समोरील वान नदीचे पात्रामधील डोहामध्ये पाय घसरुन पाण्यात बुडाल्याची घटना दि १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे घटनास्थळ हे बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील असून बुलडाणा जिल्हयातील सोनाळा पोस्टे व अकोला जिल्हयातील हिवरखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते झालेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्याने १ ऑगस्ट रोजी बुडालेल्या युवकाचा शोध घेतला मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी अंदाजे सव्वा वाजता निदर्शनात आल्या नंतर सोनाळा पोलीसांनी घटना स्थळी पंचनामा करून वरवट बकाल ग्रामीण रुग्णालय येथे श्वविच्छेन झाल्यानंतर प्रेत मृतकाच्या ताब्यात दिले मृतकाचे नातेवाईक मनोज वानखडे यांनी सोनाळा पोस्टेला दिलेल्या फिर्यार्दी वरुन सोनाळा पोलीसांनी मर्ग दाखल केला सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोहेकॉ शाकिर पटेल करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!