ब्रेकिंग न्यूज

मासे पकडणाऱ्या २३ वर्षीय आदिवासी युवकाचा पाण्यात बुडून मुत्यू ! चांगेफळ शिवारातील घटना

मासे पकडणाऱ्या २३ वर्षीय आदिवासी युवकाचा पाण्यात बुडून मुत्यू ! चांगेफळ शिवारातील घटना

संग्रामपुर [प्रतिनिधी ] मध्य प्रदेश राज्यातील उखरणी ता खकनार येथील युवक ह मु ईसाई ता जळगाव जा येथे कामाच्या शोधात आला होता ईसाई येथुन संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ शिवारात बेबळा नदि पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात मासे पकडत असतांना नदि पात्रात बुडून मुत्यू झाल्याची घटना दि ३१ जुलै रोजी ४ वाजता घडली तामगाव पोस्टे सहाय्यक पो उ नि मनोज वासाडे यांनी
स्थानिक गोताखारांच्या मदतीने रात्री शोध घेतला मात्र मिळून आला नाही दुसऱ्या दिवशी दि १ ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे ६ वाजता मृतकाचे प्रेत बंधाऱ्याच्या लोखंडी असारी मध्ये अडकलेल्या अवस्थेत मिळून आला
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि मध्यप्रदेश राज्यातील उखरणी ता खकणार ह मु ईसाई ता जळगाव जा येथील रहिवासी २६ वर्षीय सुरेश तेरसिंग भांबर कामाच्या शोधात जळगाव जा तालुक्यातील ईसाई येथे कुटुंबा सह राहत होता मिळेल ते काम करित होता काहि सहकाऱ्या सह संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ अकोली शिवारातील बेबडा नदि पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर मासे पकडत असतांना बेबडा नदि अचानक पाण्याचा प्रवाह वाढून पुराच्या पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडल्याने संबंधीत मृतकाचे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे याबाबत तामगाव पोस्टेला फिर्यार्दी भोलसिंग सोहलसिंग जमरा रा हनवतखेड यांच्या फिर्यार्दी वरून तामगाव पोस्टेला कलम १९४ बीएनएसएस २०२३ मर्ग दाखल केला असुन प्राथमिक तपास सहाय्यक पो उप निरिक्षक मनोज वासाडे यांनी केला तामगाव पोस्टेचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पुढिल तपास पोलीस हवालदार संतोष डाखोरकर करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!