पातुडर्यातील डॉ बाबासाहेब यांच्या स्पदस्पर्श ऐतिहासिक भेट स्थळी भव्य दिव्य स्मारक व्हावे प्रा जोगेन्द्र कवाडे

संग्रामपुर [प्रतिनिधी ] बुलडाणा जिल्हा संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा गावाला घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २९ मे १९२९ रोजी पातुर्डा गावाला ऐतिहासिक भेट दिली. या भेटीत त्यांनी अस्पृश्यता निवारण, शिक्षण, धर्मांतराच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. पातुर्डा येथील विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून त्यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला ऐतिहासिक भेट डॉ बाबासाहेबांनी ३० किमी पायी प्रवास करून जलंब ते पातुर्डा असा प्रवास केला.
सामाजिक समता त्यांनी स्वत विहिरीवरून पाणी काढून अस्पृश्य बंधूंना भरवले व पातुर्डा येथील आठवडी बाजार स्थित विहीर खुली केली.धर्मांतराची नोटीस या भेटीत त्यांनी अस्पृश्यांनी दिलेल्या धर्मांतराच्या नोटिसीवर चर्चा केली. समाजातील तरुण शिकलेल्या वर्गाने समाजाच्या उद्धारासाठी कार्य करण्याचे युवाशक्तीला आवाहन केले होते तसेच प्राथमिक शाळेच्या खोलीत ३ दिवस मुक्काम केला होता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळ भव्य दिव्य स्मराक व्हावे अशी मांगणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात छोटे खानी आयोजीत कार्यक्रमात आपीआय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा जोगेन्द्र कवाळे यांनी राज्यशासना कडे केली पातुर्डा ऐतिहासिक भुमित बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक साठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वास प्रा कवाडे यांनी पातर्डा वासियांना दिले यावेळी लघु उद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयदिप कवाळे , बाळा साहेब दामोधर प्रा नरेन्द्र सुरडकर , माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , मिर कुर्बान अली , सिध्दार्थ गाडे , निलेश चांडक , कैलास दाभाडे , पंजाब वानखडे , विष्णु भोंगळ आदिची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जयदिप कवाडे उपस्थितांना मार्गदर्शन म्हणाले विविध पक्ष गटात विखुरलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते सह बहुजन समाज बांधवांनी डॉ बाबासाहेबांचे कार्यकर्ते म्हणुन समाज संघटन कार्यकरावे इतर राजकिय पक्षाचे उदाहरण देत राजकारणात आपले वर्चस्त कायम ठेवणे शक्य होईल तेव्हा समाजातील सुशिक्षित युवकांना समाज संघटन सामाजीक ऐक्य साठी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे सांगीतले पातुर्डा ऐतिहासिक विहिर मराठी शाळेची मुक्काम केलेली खोलीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी रमेश दाभाडे , ॲड वानखडे , प्रा खंडेराव, सुनिल दाभाडे श्रीकृष्ण हातेकर ,सुमित वानखडे , राजेन्द्र पाचपोर ,दिनकर वानखडे , सिध्दार्थ वानखडे , कैलास गवई , संजय दाभाडे , सुरेश वानखडे, पत्रकार सुमित दामधर , उदयभान दांडगे , बहुजन समाज बांधवांना सह भारतीय बौध्द महासभा पदाधिकारी, समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या



