सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या संशयित म्युल बँक खाते प्रकरणी तामगाव पोस्टेला महाराष्ट्र बॅक संग्रामपुर शाखेतील एका खातेदारा विरूध्द गुन्हा दाखल
सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या संशयित म्युल बँक खाते प्रकरणी तामगाव पोस्टेला महाराष्ट्र बॅक संग्रामपुर शाखेतील एका खातेदारा विरूध्द गुन्हा दाखल
संग्रामपुर [प्रतिनिधी ] सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या संशयित म्युल बँक खाते प्रकरणी तामगाव पोस्टेला बॅक ऑफ महाराष्ट्र संग्रामपुर शाखेतील खाते क्रमांक 60553922745 IFSC Code MAHB0000557 या खातेदारा विरूध्द तामगाव पोस्टेचे पोलीस गोपनीय अंमलदार मनिष त्र्यंबक वानखेडे यांचे फिर्यादीवरून तामगाव पो.स्टे ला अपराध क्रमांक 228/2026 कलम-318(4) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
हकिकत अशा प्रकारे आहे की, नमुद घटना ३१ डिसेंबर २०२५ च्या १ वाजता असुन दि १९ जुलै रोजी तामगाव पोस्टेला संबंधीत खातेदार विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला यातील नमुद आरोपीने NCCRP पोर्टल Ack. No. 31901260000292 मधील तक्रारदार यांचे 50,000 रूपये रक्कम चेकद्वारे काढून आर्थीक फसवणुक केली आहे.पोलीस गोपनीय अंमलदार मनिष त्र्यंबक वानखेडे यांचे अशा फिर्यादी व लेखी तक्रारीवरून तामगाव पोस्टेचे ठाणेदार निचळ यांचे आदेशाने सदरचा दाखल करण्यात आला पुढील तपास पोउपनि विलास बोपटे हे करित आहे. यापुर्वी सोनाळा पोस्टेला सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या संशयित म्युल बँक खाते महाराष्ट्र बॅक शाखा बावनबीर खातेदार विरुध्द गुन्हा दाखल आहे



