नागपुरात मराठी भाषा गौरव दिना निमित्त सांज शब्दांची कवीता गझल बहारदार मैफिल कार्यक्रमाचे आयोजन
नागपुर [ प्रतिनिधी ] विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर यांच्या सयुक्त विदमाने मराठी भाषा गौरव दिन निमित्त सांज शब्दांची काव्यवाचन गजल मराठी कवितेच्या बहारदार मैफिल कार्यक्रमाचे आयोजन दि १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता नागपुर पोस्टेच्या मागे नियोजन भवन सभागृहात करण्यात आले असुन यावेळी वर्धाचे कवी व्याख्याते प्रताप वाघमारे , संत नगरी शेगावचे सुप्रसिद्ध हास्य कवी नितीन वरणकार, अकोलाचे हास्यकवी गझलकार गोपाल मापारी , सुप्रसिद्ध हास्य गेय कवी प्रा संजय कावरे , यांच्या उपस्थितीत सांज शब्दांची मैफिल कवी संमेलन होणार आहे यावेळी विभागीय आयुक्त नागपूरचे श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी , अप्पर आयुक्त डॉ माधवी खोडे चवरे , नागपुर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर , अप्पर आयुक्त महसुल राजेश खवले , अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार, सहा आयुक्त रोहयो अविनाश हदगल प्रमुख निमंत्रीत असुन नागपुर परिसरातील श्रोत्यांनी सांज शब्दांची काव्यवाचन गजल मराठी कवितेच्या बहारदार मैफिल प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त तथा मराठी भाषा अधिकारी नागपुर श्रीमती शिल्पा सोनाले, संतोष गोसावी सहाय्यक भाषा संचालक नागपुर , अनुप खाडे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी नागपुर यांनी एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे


