जिल्हा वार्ताशासकीय

सालवन नियतक्षेत्र वन्यजीवक्षेत्र सोनाळाचे वनरक्षक मोरे यांची जामठी येथे बदली

सालवन नियतक्षेत्र वन्यजीवक्षेत्र सोनाळाचे वनरक्षक मोरे यांची जामठी येथे बदली

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील सोनाळा वन्यजीवक्षेत्र अंतर्गत सालवन नियतक्षेत्र येथे कार्यरत कर्तव्यदक्ष वनरक्षक कपिल मोरे यांनी अवैध चराई करणाऱ्या मेंढी जप्त करुन पशुपालका विरूध्द दंडात्मक कारवाई , मध्य प्रदेशातुन चोरट्या मार्गाने सातपुडा वन क्षेत्रातुन अवैध गुरे घेऊन जाणाऱ्या वाहतुक करणारे गुरे जप्त शासन जमा करून वनविभाग कायदा अंतर्गत नियमानुसार अवैध गुरे वाहतुक करणाऱ्या पशुमालका विरुध्द कारवाई अवैध सालई गोंद चोरट्या विरुध्द कारवाई, अवैध सागवन वृक्षतोड करणाऱ्या विरुध्द कारवाई अवैध रेती वाहतुक वाहन पकडून वनविभाग कायद्या अंतर्गत कारवाई , याच बरोबर सातपुडा पर्वतात वन्यजीव साठी कुरण विकास अखादय गवताचे मिडोज तयार केले, जल जल मुध धनाची कामे जंगला बाबत नागरिकात जनजागृती केली सतत ६ वर्ष आपले कर्तव्य चोख बजावले या सर्व कामाचे मुल्यांकन दखल म्हणुन वनविभागा कडून उत्कृष्ट कार्या केल्या बद्दल सन २०२२/२३ मध्ये सुवर्ण पदक देऊन वनमंत्री व वरिष्ट अधिकाऱ्यांनी सन्मानीत केले होते कर्तव्यदक्ष सुवर्णपदक मिळविणारे वनरक्षक कपिल मोरे यांची प्रशासकीय बदली जामठी गुम्मी वर्तुळ प्रादेशिक परिक्षेत्र बुलडाणा येथे बदली झाली असुन वनपरिक्षेत्र कार्यालय सोनाळा येथे छोटे खानी कार्यक्रमात वनकर्मचारीच्या वतीने निरोप देण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!