वादळी वाऱ्यामुळे केळी संत्राच्या बागा उध्वस्त आर्थिक संकटात असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील

वादळी वाऱ्यामुळे केळी संत्राच्या बागा उध्वस्त आर्थिक संकटात असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील
संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यात १ जुन रोजी वादळी वाऱ्यामुळे केळी झाडे उन्मळून पडल्या तर संत्रा झाडे तुटल्याने निर्सगाच्या अकृपेने केळी संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले नवनिर्वाचीत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पदभार घेताच कामाला लागले वादळी वाऱ्यामुळे नुकसान ग्रस्त गाव पळशी झाशी रिंगणवाडी , काकणवाडा वडगाव वाण , काकणवाडा खुर्द , या गावातील शेत शिवारात जावुन वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचा आढावा घेत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची आस्थेने विचारपुस करून धिर दिला प्रशासनाला नुकसान ग्रस्त भागाचे तात्काळ सर्वे करण्या व आर्थिक मदत देण्या संदर्भात तहसिलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन वादळी वाऱ्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला केळी संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, तात्काळ पंचनामे करून शासनाने हेक्टरी भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मांगणी निवेदनाव्दारे जिल्हा कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली यावेळी बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, प्रकाशराव देशमुख , अताउल्लाह पठाण , मनोहर बोराखडे , तेजराव मारोडे , संतोष राजनकार , शंककरनाथ विश्वकर्मा ,महिला कॉग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष वैशाली खिरोडकार ,प्रा मोहन रौदळे , स्वप्नील देशमुख ,अमोल घोडेस्वार , गणेश मानखैर पाटील , प्रकाश देशमुख , मोहन सोनोने तसेच जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध सेल चे अध्यक्ष, कॉंग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



