पातुडर्यात राज्य महामार्ग रस्त्याचे काम रखडले ग्रा पं सदस्य कपिल गवई यांचे खंड्यात साचलेल्या पाण्यात बेशरचे झाड लावुन निषेध आंदोलन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] पातुर्डा येथुन जाणाऱ्या राज्य महामार्ग २७८ च्या सुधारणे अंतर्गत रस्ता दुरुस्तीचे काम ७ वर्षा पासुन सुरू आहे. यापुर्वी विविध वृतपत्रात या रसत्या संबंधीत वृत प्रकाशीत होताच संबंधीत कंत्राटदार कंपनीला जाग आली जेसीबी व्दारे काहि दिवसा पुर्वी रसत्याचे खोदकाम करण्यात आले रसत्यात मोठे खडडे पडले अवकाळी पावसाचे पाणी त्यात साचल्याने सदर रस्ता गावातील मुख्य रस्ता असुन रसत्या लगत लघु व्यवसाईकांचे दुकाने व वाहन धारक व प्रवाशांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रा प सदस्य कपिल गवई यांनी आपल्या सहकारी सह रसत्यात असलेल्या खडडयात बेशरमचे झाड लावुन कंत्राटदार कंपनी व प्रशासना विरुध्द रोष व्यक्त करित निषेध आंदोलन केले राज्य महामार्ग क्र २७८ खांडवी भेंडवळ पातुर्डा उकळी नेर नांदखेड किनखेड दर्यापूर आसेगाव दरम्यान सुधारणा शासनाने हाती घेतली आहे . या दरम्यान पातुर्डा गावजवळ साक्र : २६/ २०० ते २७/५०० लांबी मधील रस्त्याच्या हददी कायम करण्यात आल्या . भूमिअभिलेख विभागाने मोजणी करून रस्ता मोकळा करून दिला आहे आरोग्य केंद्र ते शाळा दरम्यान चे काम कंत्राटी कंपनीने अत्यंत ढिलाईने व निकृष्ट दर्जाचे केले असल्याची ओरड नागरिकां कडून होत आहे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी शाळा , बस स्थानक तसेच रसत्यालगतच्या घरा समोर साचते रस्ता रखडल्याने गावकरी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत . रस्त्याच्या दुतर्फा नाल्या करण्यात आल्या आहेत यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे. रस्त्यावर एखादे वाहन उभे असल्यास वाहतुकीचा खोळंबा होते सार्वजनिक विभागाने पुढाकार घेऊन रखडलेला रस्ताचे काम कंत्राटी कंपनीकडून पूर्ण करून घ्यावा अशी मागणी आंदोलन कर्ते ग्रा पं सदस्य कपिल गवई सह त्यांच्या सहकार्यांनी केली आहे .



