खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाई करा . तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाचे मुख्यमंत्री कडे मांगणी

खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाई करा .
तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाचे मुख्यमंत्री कडे मांगणी

संग्रामपुर [प्रतिनिधी ] पत्रकारांचा अपमान केल्या व धमकी दिल्या प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांचेवर कारवाई करा अशी मागणी संग्रामपुर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाच्या वतीने करण्यात आली . मुख्यमंत्री यांचे नावे तहसिलदार यांना सादर केलेल्या निवेदनात नमुद आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत . सत्य घटनांचे निष्पक्ष वार्तांकन करण्याचे कार्य पत्रकार करतात. असे असतांना पत्रकारांविषयी अपमानास्पद व धमकीची भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचत असून मुक्त पत्रकारितेवरही विपरीत परिणाम होत असल्याने त्यांचेवर लोकशाही तत्वानुसार कारवाई करण्यात यावी .सदर घटनेची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, संबंधितांकडून पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार कडून कठोर उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे . निवेदन देते वेळी
साहीत्तिक ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार प्रल्हाद सावतकार काशिनाथ मानकर सुचीत धनभर व्हाइस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष मीर मकसूद अली, नारायण सावतकर दयालसिंग चव्हाण, सतीश वानखडे, युसुफ शेख नंदु शिरसोले शेख मतीन, प्रभुदास पारस्कर, कैलास खोटे, सुचित धनभर ,अशोक अकोटकार, भगवंता चोरे, हनुमंतसिंग पुरोहित, सुमेध दामोदर, शाम बोरपी, साबीर पठाण, सुनील ढगे, शेषराव डाखोडे यांचे सह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते . सदर निवेदन तहसिलदार पाटील , तामगाव पो . स्टे .चे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनाही देण्यात आले .
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, पोलीस अधीक्षक बुलढाणा, तहसीलदार संग्रामपूर तसेच व्हॉइस ऑफ मीडिया, बुलढाणा जिल्हा यांनाही देण्यात आल्या.
पत्रकारांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असून, पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका व्हॉइस ऑफ मीडिया, संग्रामपूर तालुक्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


