जिल्हा वार्ताशिक्षण

डॉ बाबा साहेबांनी ज्ञानाचा उपयोग समाजातील शोषित पीडित वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी केला ठाणेदार संदिप काळे सोनाळ्यात पोस्टे मध्ये भिम जयंती उत्सहात

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] घटनाकार डॉ बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा देत समाजातील शोषित पिडितां स्वाभिमान, शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळवून दिला. ज्ञानाचा महासागर आधुनिक भारताचे शिल्पकार यांनी अनेक संकटे आणि अपमानाचा सामना करत त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी समाजाला दिला ज्ञानाचा डोंगर असलेले बाबासाहेबांनी उच्च शिक्षण विदेशातुन पूर्ण केले डॉ बाबा साहेबांनी ज्ञानाचा उपयोग समाजातील शोषित पीडित वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी केला त्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन सोनाळा पोस्टे मध्ये आयोजीत भिम जयंती कार्यक्रमा प्रसंगी ठाणेदार संदिप काळे यांनी केले ते पुढे म्हणाले कि
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वातंत्र्य भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात बाबासाहेबांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर लोकशाही मूल्ये, मानवाधिकार आणि समानता संविधानात रुजवली. याबद्दल त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते शांतता आणि समतेचा मार्ग दाखविणारे बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. शिक्षण, स्वावलंबन आणि समता यांचा संदेश देत आपण एक आधुनिक आणि न्याय्य समाज घडवण्याचा संकल्प या दिवशी करणे गरजेचे असल्याचे आव्हाण शेवटी सोनाळा पोस्टेचे ठाणेदार काळे यांनी केले सर्व प्रथम घटनाकार डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे विधिवंत पुजन हार अर्पण करुन सोनाळा पोलीसांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजीक समता न्याय बंधुता जपण्याची व डॉ बाबासाहेबांचे गुण अंगीकारण्याचा निर्धार पोलीस कर्मचारी व उपस्थितांनी केला सोनाळा पोस्टे मध्ये मोठ्या उत्सहात भिम जयंती साजरी करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!