कृषीजिल्हा वार्ता

वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उध्वस्त आर्थिक संकटात सापडलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्या युवा सेना (शिंदे )ची मांगणी तहसिलदार पाटील यांना निवेदन

वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उध्वस्त आर्थिक संकटात सापडलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्या युवा सेना (शिंदे )ची मांगणी तहसिलदार पाटील यांना निवेदन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यात १ जुन सायंकाळी सुसाट वादळी वारा सुटल्यामुळे गाव निहाय अंदाजे ५ हेक्टर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तर बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, तत्काळ पंचनामे करून शासनाने हेक्टरी भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने तहसिलदार कृषि अधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे. संबंधीत विभागाला दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि केळी हे अत्यंत नाजूक आणि संवेदनशील पीक मानले जाते. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक भागांत केळीची मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेआहे केळी उन्मळून झाडे तुटल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. लागवड, खते, औषधे यासाठी केलेला खर्च निघणेही आता कठीण झाले आहे. बँकांच्या व खाजगी सावकारांच्या कर्जाची परतफेड कशी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.प्रशासनाकडून मदतीसाठी शेतकऱ्यांच्या नुकसानाची गंभीर दखल घेत स्थानिक कृषी अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे सुरू करून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना एनडीआरएफ (NDRF) च्या निकषांमध्ये बदल करून किंवा विशेष पॅकेज अंतर्गत नुकसान भरपाई द्या, अशी मांगणी एका निवेदना व्दारे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्फत शासना कडे  युवासेना तालुकाप्रमुख चेतन देशमुख, उपतालुका प्रमुख रुपेश ढगे , युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोशल मीडिया किशोर रौदंळे , अक्षय ढगे, प्रमोद रमेश ढगे ,सदानंद इंगळे , सुनील अस्वार, सचिन कोकाटे , भास्कर धर्मे , श्याम उमरकर, सतीश जवंजाळ , युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!