कृषी

वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्या महाविकास आघाडीची मांगणी महसुल , कृषि विभागाला निवेदन

वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्या
महाविकास आघाडीची मांगणी महसुल , कृषि विभागाला निवेदन
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यात संध्याकाळी अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, कांदा, संत्री, निंबू, पपई व आंबा या सारखे पिके उध्वस्त झाली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसिलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान  तहसिलदार प्रशांत पाटील यांनी उद्या तातडीने मिटिंग घेऊन पंचनामे करण्याचे आश्वासन दिले.विमा कंपनीला हवेचा वेग किती होता याची माहिती हवी असते. या संदर्भात तालुक्यामध्ये वेग मोजण्याचे यंत्र आहे की नाही अशी     शंका निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली. सातत्याने निसर्गाचा तांडव पाहणाऱ्या व प्रसंगाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हवेचा वेग साधारण 110-120 किमी प्रतितास पेक्षा अधिक होता असे सांगण्यात आले. वरील सर्व चर्चा करून तहसिलदार संग्रामपूर यांनी चार दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण होतील   आश्वासन पूर्ण न झाल्यास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
याप्रसंगी रविंद्र झाडोकार (ता.प्रमुख   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) , भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अभयसिंग मारोडे , संजय मारोडे (ता. अध्यक्ष राष्ट्रवादी)
विजय मारोडे (उप ता.प्रमुख) राहुल मेटांग (तालुका सचिव) अजय घिवे (विधानसभा संघटक) प्रशांत इंगळे युवासेना (तालुका प्रमुख) पंकज मिसाळ (युवासेना उपजिल्हाप्रमुख)  गुणवंत मानखेर (किसान सेना ता.प्रमुख)  राजु भारसाकळे(उप विभाग प्रमुख) नारायण ढगे (राष्ट्रवादी) विजय ठाकरे  , धनंजय अवचार, राजू अवचार, बाळू साबे रोशन बोदोडे, स्वप्नील मारोडे, आकाश मारोडे, संजय चितोड गोपाल मिसाळ सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!