जिल्हा वार्ताशिक्षण

संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाच्या वतीने मुख्याध्यापक व गुणवंतांचा सत्कार

संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाच्या वतीने मुख्याध्यापक व गुणवंतांचा सत्कार

संग्रामपुर [प्रतिनिधी] महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पातुर्डा भेटीचा पदस्पर्श सोहळा दिनाचे औचित्य साधुन वरवट बकाल येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था सभागृहात संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाच्या वतीने मुख्याध्यापक व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील १००% निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा व वैधकिय शिक्षण पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यार्थीनी व वैधकिय शिक्षण घेणारा विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक सुरेश साबळे बुलढाणा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे प्रा डॉ दिलीप चव्हाण , संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता शाहू फुले आंबेडर विचार सरणीचे व्याख्याते अभयसिंह मारोडे उपस्थित होते . यावेळी सध्याच्या या स्पर्धेच्या युगात संख्यात्मक तर पाहिजेच पण त्याबरोबर शैक्षणिक गुणवत्ता असणे आवश्यक आहे असे मत बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्‍वरराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले . यावेळी दहावी बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवलेल्या बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या निवाना कवठळ व वडगाव वान येथील तीनही शाळांचे मुख्याध्यापक वरवट बकाल येथील सातपुडा शिक्षण संस्था व सहकार विद्या मंदिर तसेच संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल व उर्दू हायस्कुल चे मुख्याध्यापक यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . वरवट बकाल येथील प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष भाऊ भोजने तालुका अध्यक्ष मिर मकसूद अली, काशिनाथ मानकर, सरपंच प्रतिभा विजय इंगळे, सचिन पाटील, रविंद्र शिरस्कार,नारायण सावतकर साबीर खान , युसुफ शेख सुचित धनभर, सचिन पाटील, संतोष आगलावे, सतीष वानखडे कैलास खोट्टे यांच्या हस्ते यशस्वी मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविकातून भाऊ भोजने यांनी डॉ . बाबासाहेब यांच्या पातुर्डा भेटीचा संदर्भ घेऊन या दिवसाचे महत्त्व सांगितले संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता अभय सिंह मारोडे साहित्यिक भीमराव परघरमोल सुरेश साबळे प्रा डॉ विजय चव्हाण, शेख हमीद बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वरराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले . याच कार्यक्रमात एमबीबीएस पुर्ण झालेल्या सोनाळा येथील कु. अस्मिता भीमराव वानखडे व
BAMS मध्ये उच्च शिक्षण घेत असलेला संग्रामपूर येथील मोहम्मद असीम इकबाल युसुफ शेख यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला .शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . संचलन शिक्षक नेते मिलिंद सोनोने तर आभार राहुल इंगळे यांनी मानले कार्यक्रमास सतीश वानखडे,कैलास खोट्टे बालमुकुंद पाटील, युसुफ शेख पंकज तायडे,यांचे सह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते .
बॉक्स
वैदयकीय क्षेत्रात तालुक्याचे नाव रोशन करणाऱ्या तालुक्यातील दोन गुणवंतांचा सत्कार यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला .यामधे MBBS ची पदवी प्राप्त करणारी सोनाळा येथील कु. अस्मिता भिमराव वानखडे व BAMS चे भोपाळ येथे उच्च शिक्षण घेत असलेला संग्रामपूर येथील मोहम्मद असीम इकबाल युसूफ शेख यांचा यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!