जिल्हा वार्ता

वकाना ग्रा पं कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वता शिकवले होते तर सती प्रथा प्रचलीत असतांना सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सतीजाऊ दिले नाही सासरे यांच्या मुत्यू नंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या त्यांची जगातील सर्वात महान स्त्रीयांमध्ये गणना होणाऱ्या अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या अश्या महान जनतेच्या कल्याणकारी राणी अहिल्या देवि होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन ग्रा पं कार्यालय वकाना येथे ग्रा पं कार्यालयात करण्यात आले होते सर्व प्रथम अहिल्यादेवि होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन हारअर्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून सदर जयंती कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी अहिल्यादेवि होळकर यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी मल्हार सेना तालुकाध्यक्ष योगेश बाजोड,काँग्रेस कमिटी महिला संग्रामपुर तालुकाध्यक्ष वैशालीताई खिरोडकर , शीलाताई खिरोडकर , माजी उपसभापती कृ उ बा स सुरेश तायडे, प्रतिष्ठित नागरिक संतोष बाजोड, गजानन खिरोडकर, मोहन पुंडे, राहुल बाजोड, सतीश करांगळे ग्रा. प सदस्य राहुल गव्हांदे, विनायक निमकर्डे, अनंता इंगळे, सोपान वेरुळकर सह ग्रा. पं कर्मचारी श्रीराम निमकर्डे, विलास गव्हादे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!