महाराष्ट्र

सामाजीक कार्यकर्ते भावराव वानखडे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत

सामाजीक कार्यकर्ते भावराव वानखडे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टाकळी पंच (ह मु नासिक ) येथील शाहु फुले आंबेडकर विचार सरणीचे सामाजीक कार्यकर्ते भावराव देवराव वानखडे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले समाजाप्रती केलेल्या कार्याची दखल घेत ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित केले.महामानव, बोधिसत्त्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा इंदूमिल स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे यावेळी ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ. अनिल आठवले , संस्थेचे सर्व पदाधिकारी, निवड समिती आणि उपस्थित मान्यवर यांचे आभार व्यक्त करित दाखविलेला विश्वास दिलेला सन्मान माझ्यासाठी समाजसेवेची प्रेरणा अधिक दृढ करणारा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारधारेतून प्रेरणा घेत समाजातील वंचित,निराधार, वृद्ध गरजू घटकांसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची ऊर्जा या सन्मानामुळे मिळाली सदर पुरस्कार माझा नसून समाजहितासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठांचा
असल्याची प्रतिक्रिया भावराव वानखडे यांनी बोलतांना दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!