जिल्हा वार्ता

खोट्टे परिवाराचा स्तृत्य उपक्रम मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटप करून पार्थचा पहिला वाढदिवस साजरा

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] वाढदिवस म्हटला की केक कापणे, सजावट करणे आणि मित्र मंडळींसोबत आनंद साजरा करणे, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा स्तुत्य उपक्रम खोट्टे परिवाराने राबविला. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मूकबधिर विद्यालय, खामगाव येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून पार्थ गौरव खोट्टे याचा पहिला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
लहान मुलांच्या आयुष्यातील पहिला वाढदिवस हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. या आनंदाला केवळ कौटुंबिक सोहळ्यापुरते मर्यादित न ठेवता समाजातील विशेष मुलांसोबत आनंद वाटून घेण्याचा विचार खोट्टे परिवाराने कृतीतून साकारला. मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी दिशा समाजासमोर आली आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि सामाजिक जाणीव जोपासणे, हा या उपक्रमामागील सुंदर संदेश आहे.पार्थ गौरव खोट्टे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खोट्टे परिवाराने राबविलेल्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव, माणुसकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते.वाढदिवसाचा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून साजरा करण्याचा खोट्टे परिवाराचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!