चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..
सोनिया गांधीच्या पुस्तकाचा अवमान करुन त्यांचे योगदान पुसता येणार नाही !

चिखली : : सोनिया गांधी यांचा त्याग, संघर्ष आणि देशाप्रती असलेले समर्पण त्यांच्या जीवनप्रवासातून अधोरेखित होते. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुस्तकाचा अवमान करून त्यांचे योगदान’ पुसता येणार नाही. विचारांना विचारांनी उत्तर द्या, पुस्तकांची पाने फाडून विकृत संस्कृतीचे प्रदर्शन करू नका. पुस्तक हे केवळ कागदांच्या पानांचे संकलन नसते, तर ते एका काळाचा इतिहास, अनुभवांचा दस्तऐवज, विचारांची अभिव्यक्ती आणि समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असते. पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात, त्यावर टीका-टिप्पणीही करता येते. मात्र त्या विचारांना उत्तर देण्याऐवजी पुस्तकाची पाने फाडणे ही कृती वैचारिक असहिष्णुतेचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या संकुचित मानसिकतेचे दर्शन घडवणारी असल्याची टीका काँग्रेस आंदोलनकर्त्यांनी केली.
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची पाने फाडून अवमान करणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांच्या कृतीचा चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध करण्यात आला. चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, सोनिया गांधी यांच्या या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अवघ्या आठवडाभरात दोन लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाल्याची माहिती प्रकाशकांकडून देण्यात आली आहे. विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्याच दहा मिनिटांत १५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली. त्यामुळे पुस्तक फाडणाऱ्यांच्या कृतीने पुस्तकाचे नुकसान होण्याऐवजी त्याची चर्चा आणि वाचकांची उत्सुकताच वाढणार असल्याचा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी चिखली विधानसभा निरीक्षक सुरेशजी गवळी, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, शहराध्यक्ष गोपाल देव्हडे, नगरपरिषद विरोधीपक्ष नेते डॉ.मोहम्मद इसरार,बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर,जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष काशिनाथ आप्पा बोंद्रे, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस अतहर काझी, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष भाई प्रदीप आंभोरे, कार्याध्यक्ष डॉ.अमोल लहाने,युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख जाकीर, नगरसेवक आसिफ भाई, पुरुषोत्तम वायाळ सर,गोकुळ शिंगणे,संतोष देशमुख,प्रशांत भटकर,पर्यावरण सेलचे विजय पाटील,जिल्हा कॉंग्रेस सचिव सौ.अनिताताई घुगे,युवक कॉंग्रेस चे शिवराज पाटील, सेवादल चे राम भुसारी, प्रदीप पचेरवाल,अमीन खान उस्मान खान,डॉ.रवींद्र कमळस्कर,भास्कर चांदोरे,डॉ.संजय घुगे,सोशल मिडिया चे नितिन वाघ, राहुल चवरे,विजय जागृत, दिगांबर देशमाने, प्रकाश सपकाळ, विजय गाडेकर, विजय वाघमारे,व्यंकटेश रिंढे, प्रकाश चव्हाण, शेख अज्जू, अबरार बागवान, याया खान, रवी लोखंडे , सुरेश गुंजकर, मिलिंद माघाडे, कुणाल राठोड, गोपाल चव्हाण, गणेश ठेंग, उस्मान शहा, भास्कर खिल्लारे, समाधान गीते, मजहर खान, शेख आजीम, अमोल मोरे, विजय निकाळजे यांच्यासह असंख्य पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



